प्रख्यात कादंबरीकार सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित व दिग्दर्शक संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेला ‘दुनियादारी’ सिनेमा कॉलेज लाईफमधील अनेक आठवणींना उजाळा देणारा असून श्रेयस-दिग्याची मैत्री व कॉलेज कट्ट्याला जिंवत ठेवणाऱ्या या सिनेमाला तरुण मुलांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंच, शिवाय सिनेमाने अनेकांच्या कॉलेजमधील आठवणी जाग्या केल्या. सिनेमाने त्याकाळात कमाईचे अनेक रेकॉर्डस् तोडले होते. (10 years of duniyadari)
स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सुशांत शेलार, जितेंद्र जोशी, उर्मिला कोठारे, रिचा परियल्ली व अनेक तगड्या कलाकारांनी सजलेला हा सिनेमा १९ जुलै २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याला उद्या १० वर्ष पूर्ण होणार आहे. सिनेमाच्या १०व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने सिनेमाचे अनेक किस्से पुन्हा जाग्या झाल्या असून असाच एक किस्सा आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. काय आहे तो किस्सा जाणून घेऊया आजच्या जपलं ते आपलं या भागात.
पहा अंकुशने सांगितलेला या गाण्यामागचा किस्सा (ankush chaudhari sings zindagi zindagi song)

दुनियादारी सिनेमात एक गाणं होतं ‘जिंदगी जिंदगी’. जे गाणं चित्रपटातील कलाकार अंकुश व स्वप्नीलसह अभिनेते सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सुमीत राघवन, सुनील बर्वे, प्रसाद ओक, केदार शिंदे, पॅडी कांबळे, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले यांनी गायलेलं होतं. या गाण्याला तरुणांनी प्रचंड प्रेम दिलेलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे, की या गाण्याची एक ओळ बऱ्याच कलाकारांना जमली नाही, पण एका कलाकाराला जमली. ती म्हणजे अंकुश चौधरीला. (ankush chaudhari sings zindagi zindagi song)
‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमातून सुरुवात करणारा अभिनेता अंकुश चौधरी या कार्यक्रमात कोरसच्या भूमिकेत होता, पण आपल्या आवाजामुळे त्याने एकदाही संपूर्ण गायन केले नाही. जेव्हा संजय जाधवने हे गाणं गाण्यासाठी अंकुशला विचारलं, तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. पण संजयने अंकुशला केवळ शूटिंगसाठी आपण हे गाणं गाणार असल्याचं म्हणत त्याला या गाण्यासाठी तयार केलं. नेमकी याच गाण्यातील एक ओळ जेव्हा त्या कलाकारांसह अंकुशने गायलं, तेव्हा ती ओळ इतर कलाकारांपेक्षा अंकुशने बरोबर गायली. (ankush chaudhari sings zindagi zindagi song)
हे देखील वाचा : अंकुश-दीपाच्या लव्हस्टोरीचा केदारने केला खुलासा