अनेक कलाकार हे या मनोरंजन विश्वात येण्याआधी पासूनच एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आपल्या मराठी चित्रपट सृष्टी मध्ये देखील असे अनेक कलाकार आहेत. ज्यांची अगदी कॉलेज पासूनची मैत्री ते एखाद्या चित्रपटापर्यंतची आहे. अशीच एक मित्र मैत्रिणीची जोडी म्हणजे दिगदर्शक केदार शिंदे आणि अभिनेत्री दीपा परब.(Deepa-Ankush Love Story)
अगदी कॉलेजच्या दिवसापासून एकत्र असणारी ही मित्र मैत्रिणीची जोडी सध्या चर्चेत आहे ते केदार शिंदे यांच्या आगामी बाईपण भारी देवा या चित्रपटामुळे.
या संदर्भात केदार शिंदे या दीपा सोबतचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शन मध्ये लिहिलं आहे “हा माझा आणि दीपाचा पहिला एकत्र फोटो. दिपाला मी कॉलेज पासून ओळखतो. अंकुश भरत दिपा सगळे MD कॉलेज मध्ये होते. पुढे माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकातून दिपाने पदार्पण केलं. अंकुशच्या प्रेमात तर ती तेव्हा कॉलेज पासून अखंडपणे बुडाली होती. कालांतराने माझ्या मनोमनी या मोहन जोशी सोबत नाटकातही ती प्रमुख भूमिकेत होती. खुप एकत्र काम केलं. आणि… एकेदिवशी ती माझी वहिनी झालीच. (Deepa-Ankush Love Story)
अशी आहे अंकुश दीपाची प्रेमकहाणी
अंकुश चौधरी या माझ्या मित्रांसोबत आज ती संसारात सुखासमाधानाने नांदते आहे. १२ वर्षांच्या गॅपनंतर तिने माझ्या बाईपण भारी देवा या चित्रपटातून पुर्नआगमन केलं आहे. झी मराठीची “तू चाल पुढं” ही मालिका या चित्रपटाच्या नंतरची. पण आधी ती प्रदर्शित झाली. आणि आज दिपा स्टार आहे. प्रमोशनसाठी गेल्यावर तीची क्रेझ दिसते. खुप आनंद वाटतो. पण जे तिने बाईपण भारी देवा चित्रपटात काम केलं आहे ते पाहून ती किती प्रगल्भ कलावंत आहे, ते समजतं. तुम्ही या माझ्या वहिनीच्या कामावर प्रचंड प्रेम कराल याची खात्री आहे.”
अभिनेत्री दीपा परब सध्या झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील दीपाचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस देखील उतरतोय. तर केदार शिंदे यांच्या महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाने रुपेरी पडदा गाजवल्यानंतर त्यांचा बाईपण भारी देवा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला. तर केदार शिंदे यांचा हा चित्रपट आणि दीपाची या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरते हे पाहणं रंजक ठरणार आहे.(Deepa-Ankush Love Story)