शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित “पाहिजे जातीचे” चित्रपटाचा ट्रेलर लाँच.

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 18, 2023 | 5:09 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
pahije jatiche

pahije jatiche

मराठी मनोरंजन विश्वात नाटक हे मनोरंजनाचं एक उत्तम माध्यम मानलं जातं. जेव्हा जेव्हा नाटकांचा विषय निघतो तेव्हा एक नाव हमखास घेतलं जातं ते म्हणजे लेखक, दिग्दर्शक विजय तेंडुलकर. विजय यांच्या नाटकांवर आधारित पुढे अनेक चित्रपट केले गेले. विजय यांच्या नाटकावर आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित विजय यांचं ” पाहिजे जातीचे हे नाटक चांगलंच गाजलं होतं. याच नाटकावर आता ” पाहिजे जातीची” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(pahije jatiche)

कबड्डी नरेंद्र बाबू दिग्दर्शित आणि डॉ. मल्लिकार्जुन एन. गजरे यांची निर्मिती असलेला ‘पाहिजे जातीचे’ हा चित्रपट सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर भाष्य करणारा आणि प्रश्न विचारणारा चित्रपट आहे, असे ट्रेलरवरून दिसून येते. यात विक्रम गजरे, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, संजना काळे हे कलाकार मुख्य भूमिकेत असून पुन्हा एकदा सयाजी शिंदे आपला हटके अभिनय सादर करण्यासाठी तयार आहेत. एका लहान गावातील महिपती या महत्त्वाकांक्षी तरूणाची कथा असून, केवळ जातीमुळे समाज त्याचे पाय खेचू पाहतो, मात्र त्यातूनही तो यशस्वी भरारी कशी घेतो यावर आधारलेला हा चित्रपट आहे.

(pahije jatiche trailer)

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमास कलाकार सयाजी शिंदे, विक्रम गजरे, संजना काळे, दिलीप अहिरे, निर्माते डॉ. मल्लिकार्जुन एन. गजरे, लेखक-दिग्दर्शक कबड्डी नरेंद्र बाबू, संवाद लेखिका उमा कुलकर्णी, संगीत दिग्दर्शक अन्वेषा हे उपस्थित होते.(pahije jatiche trailer)

आजच्या काळातही जातीच्या एका लेबलमुळे होतकरू मुलांचे आयुष्य धुळीस मिळण्याचे मोठे प्रमाण दिसून येते. त्यामुळे जातीपातीत न अडकता केवळ हुशारी आणि गुणांच्या जोरावर प्रगती केली पाहिजे ही शिकवण देणारा हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे.

Tags: pahije jatichepahije jatiche new moviesayaji shinde
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Bhagya Dile Tu Mala

निवेदिता यांना कळणार राज कावेरीचं सत्य, निवेदिता यांचं मोठं पाऊल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.