बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमान या अभिनय क्षेत्रातील ७०-८०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांच्या सौंदर्याच्या तर आजही बरेच चाहते आहेत. त्यांनी आपल्या अभिनयातून तो काळ गाजवला होता. सध्या त्या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे बऱ्याच चर्चेत असतात. आताही त्यांनी केलेली पोस्ट बरीच चर्चेत आहे. सध्या जीनत सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहेत. त्या वेगवेगळ्या पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांच्या पोस्टवरून युवावर्गाला बरंच मार्गदर्शनही होतं. (Zeenat aman borrows designer clothes and jewellery on loans)
अशाच त्यांच्या एका पोस्टने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. यात पोस्टमध्ये त्यांनी फोटो शेअर करत भलं मोठं कॅप्शन लिहिलं आहे. त्यात त्या लिहितात की, “सेलिब्रेटींचे महागडे कपडे किंवा त्यांची लाईफस्टाइल पाहून संकोचित होण्याची गरज नाही. जे आहे त्यातच आनंदी राहता आलं पाहिजे. हा फोटो मागच्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या एका फॅमेली फंक्शनमधला आहे. मी माझं एक सिक्रेट सुद्धा आज तुम्हाला सांगते. बऱ्याचदा मी परिधान करत असलेले असे डिझायनर कपडे मी उधारीवर घेत असते. माझ्याकडे जे दागदागिने आहेत ते अर्जेंटमच्या विमलने मला लोनवर दिले आहेत. हा पावडर ब्लू शरारा माझी मैत्रीण मोहिनी छाबडिया यांनी पाठवला आहे. हा ड्रेस ड्रायक्लीन करून तिला पुन्हा पाठवून देईन”, असं झीनत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीलं आहे.
आणखी वाचा – “निदान आज तरी…”, शशांक केतकरची रस्त्यावरील सिग्नलबाबत पोस्ट, म्हणाला…
त्या पुढे लिहितात, “मी फक्त हे याचसाठी सांगते की तरुणांनी त्यांच्या खर्चावर ताबा ठेवावा. मी बऱ्याचदा अशा काही तरुणांना पाहते जे प्रसिद्ध डिझायनर्सचे कपडे परिधान करत असतात. तुम्ही भाड्याने कपडे घ्या किंवा खरेदी करा पण उगाच अवाजवी खर्च करु नका. तुमचा बँक बॅलेन्स टिकवून ठेवा. तुम्ही जे कपडे परिधान करता त्यात तुम्ही समाधान मानलं पाहिजे”, असं लिहित त्यांनी युवावर्गाला छान कल्पना सुचवली आहे.
जीनत अशा विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अशा विविध पोस्ट मधून त्या त्यांच्या चाहत्यांना चित्रपटांसह इतर किस्से व जुन्या गोष्टी शेअर करताना दिसतात.