हिंदी चित्रपटामध्ये प्रवेश करणे आणि तिथे स्थिर होणे हे कठीण आहे. तसेच बाहेरुन आलेल्या लोकांसाठी मनोरंजन क्षेत्रामध्ये टिकून राहणे खूपच त्रासदायक असल्याचे आजवर अनेक कलाकारांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्ये घराणेशाहीला घेऊनही अधिक चर्चा होत असलेली दिसून येते. ८० व ९० च्या दशकामध्ये अनेक दिग्गज निर्माते व अभिनेत्यांनी त्यांच्या मुलांना चित्रपटसृष्टीमध्ये लॉंच केले. काहींनी चित्रपटसृष्टीमध्ये नाव निर्माण केले तर काहींच्या पडली अपयश आले. त्यातीलच एक अपयशी अभिनेता म्हणजे रजत बेदी. ‘कोई मिल गया’ या चित्रपटातून अधिक प्रकाशझोतात आला. रजत हा आऊटसायडर नसून त्यांचे संपूर्ण कुटुंब हे चित्रपटसृष्टीशी निगडीत आहे. (actor rajat bedi)
रजतने १९९८ साली ‘२००१: दोन हजार एक’ मधून चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. पण त्याचा हा पहिलाच चित्रपट सपशेल आपटला. त्यानंतर त्याने ‘इंटरनॅशनल खिलाडी’ या चित्रपटामध्ये दिसून आला होता. पण ‘जोडी नं.१’ या चित्रपटामध्ये त्याला विशेष भूमिका मिळाली होती आणि हा चित्रपटही यशस्वी झाला. त्यानंतर तो सनी देओलबरोबर ‘इंडियन’ या चित्रपटामध्येही दिसून आला होता.
पण २००३ साली आलेल्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटाने त्याला विशेष ओळख मिळाली. हा चित्रपट खूप यशस्वी झाला. यामध्ये हृतिक रोशन मुळखी भूमिकेमध्ये दिसून आला होता. तसेच रजत खलनायकाच्या भूमिकेत दिसून आला. पण नंतर तो चित्रपटसृष्टीपासून दूर झाला. एका मुलाखतीमध्ये त्याला विचारले असता त्याने सांगितले की, “मी खूप निराश झालो होतो त्यामुळे मी भारत सोडून कॅनडाला निघून गेलो. मी माझ्या करिअरमध्ये काय करतोय असा मला प्रश्न पडला होता”.
पुढे तो म्हणाला की, “कोई मिल गया’ या चित्रपटामध्ये माझे अनेक सीन कट करण्यात आले होते. त्यामध्ये मी खूप काम केलं होतं. मी प्रीती झिंटाबरोबरही एक सीन केला होता. पण फायनल कटमध्ये हे सीन नव्हते. तसेच या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळीही मला डावलण्यात आले होते”. त्यानंतरही त्याने काही चित्रपटांमध्ये काम केले पण ते चित्रपट चालले नाहीत.
सरतेशेवटी त्याने भारत सोडला आणि कॅनडा येथे रियल इस्टेटचे काम करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने पंजाबी चित्रपटांची निर्मितीदेखील केली. त्याची मुलं मोठी झाल्यानंतर तो भारतात परत आला. त्याने दाक्षिणात्य व पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले. तो आता ‘अहिंसा’ या चित्रपटामध्ये दिसून आला होता.