बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पडूकोण ही गेल्या काही दिवसांपासून गरोदरपणाच्या चर्चामुळे अधिक प्रकाशझोतात आहे. काही महिन्यांपूर्वी दीपिका व रानवीर सिंहने आई-वडील होणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर दोघांवरीही प्रेमाचा व शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. सर्वच स्तरातील लोक त्यांना अभिनंदन करत होते. तसेच दोघेही अनंत अंबानी व राधिका मार्चट यांच्या प्री-वेडिंग कार्यकर्मामध्ये दोघेही खूप मजा-मस्ती करताना दिसले होते. दोघांचे व्हिडिओदेखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाव्हीआर व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा दीपिका तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. (deepika padukone post)
आई वडील होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिल्यानंतर दीपिका व रणवीरने बाळ झाल्यानंतर त्याच्या संगोपनासाठी वेळ देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांच्या निर्णयाचे कौतुकदेखील करण्यात आले. आता मात्र दीपिकाच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “कमी पोस्ट करा,काम अधिक करा,तुलना कमी करा, तक्रार कमी करा. प्रार्थना अधिक करा,चर्चा कमी करा आणि अधिक मिळवा”, आशा आशयाची पोस्ट तिने केली आहे. या पोस्टमधून तिला नक्की काय सांगायचं आहे हे अद्याप समजले नाही. तरीही नेटकरी हे सर्व तिच्या गरोदरपणाच्या होणार्या चर्चावर बोलत असेल असा अंदाज बांधत आहेत.
दरम्यान रणवीर व दीपिकाने फेब्रुवारी माहिन्यात सोशल मीडियावर गुडन्यूज देण्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये ‘सप्टेंबर २०२४’ असे लिहून त्यामध्ये लहान मुलांचे कपडे, खेळणी,फुगे देखील होते. दोघांनी २०१८ साली इटलीतील लेक कोमो येथे लग्न केले होते. लग्नाच्या आधी अनेक ववर्ष ते दोघ एकमेकांना डेट करत होते. लग्नाच्या आधी दोघेही ‘बाजीराव मस्तानी’,’रामलीला’,’८३’,’ पद्मावत’ या चित्रपटामध्ये दिसून आले होते. आता दोघेही ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये एकत्रित पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
तसेच दीपिकाचा आगामी चित्रपट ‘कल्कि २८९८’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे जाऊ शकते. एप्रिल ते जून या महिन्यात लोकसभा निवडणूका असल्याने निर्माते लवकरच नवीन तारीख जाहीर करू शकतात.