मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“उलट बोलतो, पोलिस स्टेशनला चल”, पुण्यात ओला ड्राइव्हरने दिलेल्या वागणूकीवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “लाजिरवाणा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 8, 2024 | 7:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aditi sarangdhar angry on cab driver

"एसी चालू कर, गरम होतंय", पुण्यात प्रवासादरम्यान अदिती सारंगधरला आला धक्कादायक अनुभव, खासगी कारचालकावर संतापली, म्हणाली, "तू मला उलट…"

सोशल मीडियावरुन बरेचसे कलाकार मंडळी त्यांना आलेले अनुभव प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या मांडत असतात. बरेचदा प्रवासादरम्यान वा वाहतुकीदरम्यान आलेले अनुभव ते त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतात. आजवर अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांनी टोलनाका, प्रायव्हेट कारद्वारे झालेली फसवणूक यांचे अनेक किस्से सांगितले आहेत. अशातच आता एका लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीला सुद्धा एका प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. ही अभिनेत्री म्हणजेच ‘वादळवाट’ फेम अदिती सारंगधर. अदितीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पुण्यात प्रायव्हेट कॅबने फिरतानाचा एक अनुभव शेअर केला आहे. थेट गाडीतून ड्रायव्हर बरोबरच्या संभाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. (aditi sarangdhar angry on cab driver)

अभिनेत्रीने पुण्यातील प्रवासादरम्यानचा एक अनुभव शेअर केला आहे. “एसी चालू करणार आहेस की नाही? आम्हाला खूप गरम होतंय”, असं अभिनेत्री त्या ड्रायव्हरला ओरडून विनवणी करून सांगताना दिसत आहे. यावर काचा बंद केल्यावरच एसी लावेन असं उत्तर डायव्हर अभिनेत्रीला देतो. मात्र, वाढत्या उकाड्यामुळे “एसी फास्ट कर म्हणजेच २ वर चालव”, असं अदिती त्याला सांगते. मात्र एसी २ वर नाहीतर १ वर चालवणार आणि ते पण काचा बंद केल्यावर असं ड्रायव्हर म्हणतो. त्यानंतर संतापून अभिनेत्री त्याला ‘गाडी पोलीस स्टेशनला घेऊन चल’, असं सांगते. तेव्हा ड्रायव्हर उद्दामपणे, ‘हो चला’, असं बोलताना दिसतो.

“आजी, मालिकाविश्व अन्… प्रामाणिक मत”, प्रसाद जवादेने शेअर केला ‘पारू’ मालिकेच्या चाहतीचा खास किस्सा

View this post on Instagram

A post shared by ADITI SARANGDHAR OFFICIAL (@adsarangdhar)

व्हिडीओच्या शेवटी “तू मला उलट, उद्दाम बोलत आहेस. एसी चालू कर मला गरम होतंय. तुझा एसी पूर्ण चालतोय का?”, असे प्रश्न विचारत संतापल्याच दिसतंय. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये “अतिशय घृणास्पद व लाजिरवाणा प्रकार या संबंधित चालकाला रिपोर्ट करा”, असं अदितीने म्हटलं आहे. व्हिडीओच्या खाली कॅप्शनमध्ये अदितीने ओला कॅब या नामांकित कंपनीला वाईट सर्व्हिसबाबत मत मांडत टॅगही केलं आहे.

Video : मित्रासाठी मंचावरच संजय मोनेंना रडू कोसळलं, उपस्थित कलाकारांच्याही डोळ्यात पाणी, म्हणाले, “४० वर्ष आम्ही एकत्र…”

अदितीने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. दरम्यान, बऱ्याच प्रेक्षकांनी हा व्हिडीओ पाहून ड्रायव्हरची बाजू घेतली आहे. तर अदितीने मांडलेला मुद्दा काहींना न समजल्याने त्यांनी थेट ड्रॉयव्हरची बाजू बरोबर असल्याचं म्हटलं. तर काहींनी अदितीची बाजू मांडत पुण्याच्या ड्रॉयव्हरला बोलायची पद्धत माहित नसल्याचंही म्हटलं आहे. सदर व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत.आणखी वाचा – Video : मित्रासाठी मंचावरच संजय मोनेंना रडू कोसळलं, उपस्थित कलाकारांच्याही डोळ्यात पाणी, म्हणाले, “४० वर्ष आम्ही एकत्र…”

Tags: aditi sarangdharaditi sarangdhar angry on cab driverentertainmentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Paaru Serial Update

दिशाचा नवा डाव अन्…; पारूसमोर येणार का तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा खरा चेहरा?, मालिकेच्या कथानकला पुन्हा नवं वळण, पुढे काय घडणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.