झी मराठी वाहिनीवर लवकरच ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका सुरु होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचे नवनवीन जबरदस्त प्रोमो प्रदर्शित होत आहेत. या मालिकेतून ‘लागिरं झालं जी’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता नितीश चव्हाण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमधली उत्सुकता वाढली आहे. या नव्या मालिकेत झळकणाऱ्या बऱ्याच कलाकारांची नावं समोर आली आहेत. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत ‘झी मराठी’चा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार आहे. ‘लागिर झालं जी’ फेम नितीश चव्हाण या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार असून त्याच्या पात्राचे नाव सूर्या दादा असं आहे.
नुकतंच साताऱ्यात या मालिकेचे दणक्यात प्रमोशन पार पडले. ढोल-ताशांच्या गजरात ‘सूर्या दादा’चे स्वागत झाले. यावेळी नितीश चव्हाणने सूर्या दादा या त्याच्या पात्राच्या भव्य ३० फूट प्रतिमेचं अनावरण केले. यावेळी त्याच्या लाडक्या बहिणी उपस्थित होत्या. सातारकरांनी हे क्षण साक्षात अनुभवले, शिवाय प्रेक्षकांनाही हा सोहळा पाहता येणार आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा सेट हा अगदी भव्यदिव्य असून हा सेट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. नक्की काय काय आहे या सेटवर. चला जाणून घेऊयात…
आणखी वाचा – कधीही स्वयंपाकघरात न गेलेल्या शिवाची अशी होतेय तारांबळ, सिलेंडरही उचलला अन्…; मालिकेचा BTS व्हिडीओ समोर
‘लाखात एक आमचा दादा’ या सेटवर एक भव्य वाडा असून या वाड्याला हार फुलांनी सजवला आहे. तसेच या वाड्याचे दार हे केळींच्या पानांनी सजवलं आहे. तसेच या वाड्यामध्ये भव्य असा देव्हारा असून हा देव्हारा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. देव्हाऱ्यात दत्तगुरु, गणपती, स्वामी समर्थ, तुळजा भवानी, ज्योतिबा अशा अनेक देवांची प्रतिमा आहेत. तर देव्हाऱ्याच्या मध्यभागी देवीची मूर्ती आहे. तसेच आजूबाजूला अनेक देवांच्या मूर्त्त्या आहेत. त्याचबरोबर घरातील खोल्याही अगदी आकर्षक आहेत., उत्तम रंगसंगती व आकर्षक अशा वस्तूंनी या खोल्या सजवल्या आहेत.
आणखी वाचा – प्रथमेशने लग्नातील ‘ती’ गोष्ट अजूनही ठेवली आहे जपून, खास व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाला, “वरमाला…”
दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ या नव्या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण सूर्यादादाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. एक भाऊ आणि चार बहिणी यांच्या भोवती फिरणारी या नव्या मालिकेची कथा आहे. अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समुद्धी साळवी (धनश्री), इशा (राजश्री), जुई तनपुरे (भाग्यश्री) या चारजणी बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहे. ८ जुलैपासून रात्री साडे आठ वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे.