रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रथमेशने लग्नातील ‘ती’ गोष्ट अजूनही ठेवली आहे जपून, खास व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाला, “वरमाला…”   

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 5, 2024 | 5:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Prathamesh Parab made a clock from roses from his varmala video shared on Instagram

प्रथमेशने लग्नातील ‘ती’ गोष्ट अजूनही ठेवली आहे जपून, खास व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाला, “वरमाला...”

‘टाईमपास’, ‘टकाटक’, ‘बीपी’, ‘उर्फी’ अशा अनेक चित्रपटातून अभिनेता प्रथमेश परब घराघरांत पोहोचला. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला. प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नसोहळ्याची बरीच चर्चा रंगलेली होती. क्षितिजा व प्रथमेश बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. २४ फेब्रुवारी रोजी प्रथमेश व क्षितिजा यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.

चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावरटो आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच त्यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. प्रथमेश व क्षितिजा यांनी त्यांच्या लग्नातील हारांमधील गुलाबांपासून् एक खास वस्तु बनवली आहे. प्रथमेश-क्षितिजा यांनी त्यांच्या लग्नातील हारांमधील गुलाबांपासून घडयाळ बनवली आहे. याचाच खास व्हिडीओ शेअर करत त्यांनी यामागील कारणही सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

आणखी वाचा – आईच्या आठवणीत आस्ताद काळे भावुक, वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट, म्हणाला, “दु:ख आहे पण…”

प्रथमेशने शेअर केलेल्या व्हिडीओबरोबरचं असं म्हटलं आहे की, “लग्न, आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस आणि या दिवसातील प्रत्येक क्षण, गोष्टी आणि आठवणी कायम आपल्या मनाच्या हळव्या कोपऱ्यात असतांतच. या सगळ्या गोष्टींमध्ये, एक गोष्ट खास असते ती म्हणजे ‘वरमाला’. म्हणजे क्षतिजाला प्रपोज  करताना दिलेलं गुलाब ते गुलाबाची वरमाला”.

आणखी वाचा – कधीही स्वयंपाकघरात न गेलेल्या शिवाची अशी होतेय तारांबळ, सिलेंडरही उचलला अन्…; मालिकेचा BTS व्हिडीओ समोर

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “असं म्हणतात, आठवणी वस्तुरुपात बंदिस्त करता येत नाहीत, पण हिच वरमाला आणि तिच्याबरोबरच्या आठवणी कायम बरोबर राहतील असं छानसं गिफ्ट आम्ही तयार केलं आहे” दरम्यान, प्रथमेश-क्षितिजा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेकांनी त्यांना ही खास गोष्ट आवडल्याचे म्हटलं आहे. “खूप सुंदर”, “खूप छान”, “खूपच चांगली कल्पना आहे”, “तुमची जोडी खूप छान आहे” अशा अनेक  कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.    

Tags: marathi actorprathamesh parabPrathamesh Parab made a clock from roses
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Deepika padukone and ranveer singh baby

दीपिका पदुकोण व रणवीर सिंगला होणार मुलगा, सेलिब्रिटी ज्योतिषांनी केली भविष्यवाणी, म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.