मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याने माझ्या स्तनांना पकडलं आणि…”, दादरसारख्या शहरात अभिनेत्रीसह घडलेली वाईट घटना, म्हणालेली, “तीन सेकंड मला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 22, 2025 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
man misbehaved with priya bapat

"त्याने माझ्या स्तनांना पकडलं आणि…", दादरसारख्या शहरात अभिनेत्रीसह घडलेली वाईट घटना, म्हणालेली, "तीन सेकंड मला…"

man misbehaved with priya bapat : बॉलिवूड सिनेविश्वात अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांनी त्यांच्याबरोबर घडलेल्या वाईट प्रसंगांबाबत भाष्य केलं आहे. कलाकार म्हटलं की त्यांना अनेकदा कास्टिंग काऊचचा अनुभवही आलेला आहे. तर यानंतर अनेक मराठी अभिनेत्रींनीही त्यांच्याबरोबर घडलेल्या वाईट प्रसंगाबाबत भाष्य करायला सुरुवात केली. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्याबरोबर घडलेल्या एका वाईट प्रसंगाबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. प्रियाने आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिकांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावर प्रिया बऱ्यापैकी सक्रिय असते. इतकंच नाहीतर सध्या प्रिया रंगमंचाकडे वळलेली पाहायला मिळतेय.

अर्थात प्रियाने सांगितलेला हा वाईट किस्सा वर्षभरापूर्वीचा आहे. मात्र अभिनेत्रीची ही मुलाखत सध्या ट्रेंडिंगमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. प्रियाने वर्षभरापूर्वी ‘हॉटरफ्लाय’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये प्रियाची एका व्यक्तीने तिची छेड काढल्याचा प्रसंग सांगितला आहे. अभिनेत्री म्हणाली, “ही घटना २०१०ची आहे. मुंबईतील दादरमधील घटना आहे. माझ्या घराच्या समोरच्या गल्लीतील घटना आहे. मी शुटिंगवरून येत होते आणि मी फोनवर माझ्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत होते. फोन कानाला लावून मी हातातून सामान घेऊन जात होती”.

आणखी वाचा – “माझ्यावर घाणरेडे विनोद करुन प्रसिद्धी मिळवली”, अभिनेत्रीचा कपिल शर्माला टोला, म्हणाली, “त्याचं वाईट…”

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

अभिनेत्री पुढे म्हणाली, “एक माणूस समोरुन आला, त्याने माझ्या स्तनांना पकडलं आणि तो निघून गेला. मला कळेचना काय झालं. ते सगळं समजून घ्यायला मला तीन सेकेंड लागले. मी फक्त उभी होते आणि मला कळलंच नाही काय झालं. मी मागे पाहिलं तर तो कुठेच दिसला नाही. तो तिथून लगेच एका क्षणार्धात निघून गेला. मी घरी गेले तेव्हा माझी आई नव्हती घरी. माझे बाबा घरी होते. मी ढसाढसा रडायला लागले, मला बाबांनी विचारलं काय झालं? मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला”.

आणखी वाचा – “शॉर्ट्स वाली देशी लाडकी”, ६६ वर्षीय नीना गुप्ता तोकडे कपडे घालण्यावरुन ट्रोल, नेटकऱ्यांना उत्तर देत म्हणाल्या, “चांगले शरीर नाही म्हणून…”

प्रिया पुढे म्हणाली, “एक पुरुष म्हणून त्यांना लाज वाटली आणि काय करावं हे त्यांना समजत नव्हतं. पण, तेव्हा मी ठरवलं जर कोण माझ्या वाट्याला आलं आणि वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याला सोडायचं नाही. तेव्हाच राग अजूनही माझ्या मनात आहे”. प्रियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती तिचा पती उमेश कामतसह ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Tags: entertainmentmarathi actresspriya bapat
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Bharati Singh Mother Father

दारू प्यायले, रक्ताच्या उलट्या झाल्या आणि…; दोन वर्षांची असताना भारती सिंगच्या वडिलांचे झालेले निधन, अभिनेत्रीला त्यांची एकही आठवण ठेवायची नाही कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.