झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे. रहस्यमय कथानकामुळे ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका होत आहे. मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेच्या आगळ्या वेगळ्या कथानकाने व कलाकारांच्या उत्तम अभिनयाने ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. अशातच आता ही मालिका हिंदीतही येणार आहे.
सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेच्या हिंदी रिमेकबद्दल नुकतीच घोषणा करण्यात आली असून याबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. ‘मराठी सीरियल्स’ या इन्स्टाग्राम पेजद्वारे या मालिकेच्या हिंदी रिमेकबद्दलची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टखाली “झी मराठीवरील हिट मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ आता हिंदीमध्येही येणार आहे आणि याचे नाव ‘सातवे लडकी की सातवी बेटी’ असं नाव आहे. ही मालिका ‘& टीव्ही (अँड टीव्ही)वर प्रसारित केली जाईल” असंही म्हटलं आहे.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका सध्या रंगतदार वळणावर आली आहे. नेत्रा आणि विरोचकमध्ये वार-पलटवार सुरू आहे. सस्पेन्स, थ्रिलर असलेल्या मालिकेत रोजच नवीन व वेगवेगळे ट्विस्ट येत असतात. त्यामुळे ही मालिका सर्वांच्याच पसंतीस पडते. अशातच मालिकेत सध्या पंचपिटीकेचा शोध सुरु आहे. राजाध्यक्ष कुटुंबियांसह रुपालीही या पंचपिटीकेचा शोध घेत आहे.
आणखी वाचा – “रुपालीलाच मालिकेतून काढून टाका”, ‘अप्पी आमची…’वर प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले, “कलेक्टरच्या पोस्टला…”
या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेतील मुख्य पात्राला भविष्य दिसत असल्याने तिला वाईट समजलं जातं. अशी कथा असणारी ही एकमेव मालिका नाही. झी मराठीवरील ही मालिका बंगाली मालिका ‘त्रिनयनी’ची रिमेक आहे. येत्या २७ मे पासून ही मालिका प्रेक्षकांना ‘& टीव्ही’ (अँड टीव्ही)वर पाहता येणार आहे.
आणखी वाचा – ‘धडक २’ चित्रपटाची मोठी घोषणा, मात्र जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत नाही, दोन नवीन कलाकार दिसणार
दरम्यान, या मालिकेत तितीक्षा तावडे व अजिंक्य ननावारेच्या मुख्य भूमिका आहेत. त्यांच्याशिवाय या मालिकेत ऐश्वर्या नारकर, श्वेता व राहुल मेहंदळे, अजिंक्य जोशी, जयंत घाटे यांसह अनेक कलाकारांच्या महत्त्वपपूर्ण भूमिका आहेत. या मालिकेच्या हिंदी रिमेकबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागली असून या मालिकेत कोणते काळककार पाहायला मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे