Zee Marathi Awards 2024 : ‘झी मराठी’ वाहिनी ही नात्यांच्या जवळ नेत प्रेक्षकांच्या नेहमीच मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. या वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याचीही प्रेक्षकमंडळी आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळी सणादरम्यान आयोजित केला जाणारा झी मराठी पुरस्कार सोहळ्याकडे सारेजण डोळे लावून बसले होते. यंदा या सोहळ्याचं २५ वं वर्ष आहे. त्यामुळे हा सोहळा आज २६ व २७ ऑक्टोबर असा दोन दिवस प्रक्षेपित केला जाणार आहे. ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्याचा पहिला भाग काल पार पडला. यंदा पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अखेर पहिल्या भागाच्या विजेत्यांची यादी आता समोर आली आहे.
‘झी मराठी’ पुरस्कार सोहळा भाग – १ विजेते
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री – दुर्गा ( नवरी मिळे हिटलरला )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष – प्रितम ( पारू )
सर्वोत्कृष्ट मैत्री – शिवा, पाना गँग ( शिवा )
सर्वोत्कृष्ट आजी – बाई आजी ( शिवा )
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – अमोल, गनी, बनी, चिनू-मनू, बटर
सर्वोत्कृष्ट सासरे – रामभाऊ ( शिवा )
सर्वोत्कृष्ट जावई – ए.जे. ( नवरी मिळे हिटलरला )
झी मराठी रायझिंग स्टार – सूर्या दादा ( लाखात एक आमचा दादा )
सर्वोत्कृष्ट मुलगी – पारू ( पारू )
सर्वोत्कृष्ट मुलगा – अधिपती ( तुला शिकवीन चांगलाच धडा )
सर्वोत्कृष्ट सून – लीला ( नवरी मिळे हिटलरला )
सर्वोत्कृष्ट सासू – लीला ( नवरी मिळे हिटलरला )
आणखी वाचा – “तुला बघून खूप बरं वाटलं”, अंकिताच्या आईचा सूरज चव्हाणला व्हिडीओ कॉल, म्हणाला, “मी आहे ना तिचा भाऊ आणि…”
विशेष लक्षवेधी चेहरा – लीला ( नवरी मिळे हिटलरला )
‘झी मराठी’ जीवनगौरव पुरस्कार – श्रीरंग गोडबोले
सर्वोत्कृष्ट शायनिंग पुरस्कार – भुवनेश्वरी ( तुला शिकवीन चांगलाच धडा )
Zee 5 लोकप्रिय व्यक्तिरेखा पुरुष – आशू ( शिवा )
Zee 5 लोकप्रिय व्यक्तिरेखा स्त्री – पारू ( शिवा )
Zee 5 लोकप्रिय मालिका – शिवा
विशेष योगदान पुरस्कार – संदीप रसाळ
आता उर्वरित पुरस्कार आज म्हणजेच २७ ऑक्टोबर रोजीच्या भागात घोषित केले जाणार आहेत. आता सर्वोत्कृष्ट नायिका, नायक, मालिका अशा महत्त्वाच्या पुरस्कारांवर कोण नाव कोरणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.