शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अरमान मलिकच्या दोन्ही पत्नींमध्ये वादाची ठिणगी, होणार वेगळ्या, youtuber चा मोठा खुलासा, म्हणाला, “आतापासून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 27, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Armaan Malik  Wife

अरमान मलिकच्या दोन्ही पत्नींमध्ये वादाची ठिणगी, होणार वेगळ्या, youtuber चा मोठा खुलासा, म्हणाला, "आतापासून…"

Armaan Malik  Wife : ‘बिग बॉस ओटीटी ३’ मुळे प्रसिद्धी झोतात आलेले नाव म्हणजे अरमान मलिक. अरमान मलिक हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. दोन विवाहसोहळ्यामुळे अरमान मलिकला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अरमानच्या दोन बायका पायल मलिक आणि कृतिका मलिक एकत्र राहतात. दोघेही बहिणींसारखे एकाच छताखाली राहतात. पायल आणि कृतिका घर संभाळण्याशिवाय व्यवसायाकडेही लक्ष देतात. पण आता या दोन बहिणींसारख्या राहणाऱ्या सवतींमध्ये खूप मोठी दरार आली आहे. पायल आणि कृतिकाच्या नात्यात वादाची ठिणगी पडली आहे.

सारखेच कपडे परिधान करणाऱ्या या दोन सवती नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. दोघीही अरमानबरोबर कमी आणि एकमेकींसह अधिक एकत्र असताना दिसतात. परंतु आता दोघांनीही त्यांच्या या जाबदाऱ्या विभक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. अरमानने एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. अरमान मलिकने पायलबरोबर घटस्फोट न घेता कृतिकाबरोबर लग्न केले. कृतिका आणि पायल आता एकाच घरात राहतात. अरमानचे आधी एक लग्न झाले असून त्याचा घटस्फोट झाला. त्यानंतर अरमानने कृतिका व पायल यांच्याशी लग्न केले.

आणखी वाचा – “सोफ्यावर बसून कोण पूजा करतं?”, संजय दत्तचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “देवाला…”

View this post on Instagram

A post shared by Kritika malik (@kritika_malik_9)

अरमान मलिक याने आता त्याच्या दोन्ही बायका वेगळ्या राहणार असल्याचं व्हिडीओद्वारे म्हटलं आहे. त्याने असं म्हटलं आहे की, “पायल आणि कृतिका यांना वेगळं व्हायचं आहे. कृतिका म्हणतेय की ती व्यवसाय सांभाळेल आणि पायल मुलांना घरी सांभाळेल. यानंतर, अरमान पायलला विचारतो, “तुम्ही मुलांना हाताळण्यास तयार आहात का?”. यावर, पायल उत्तर देत म्हणते, “कृतिका जसं म्हणेल मी त्यात आनंदी आहे. मी सर्वत्र आनंदी आहे. मी ऑफिसमध्येही आनंदी आहे आणि मी मुलांसह आनंदी आहे”.

आणखी वाचा – सिनेसृष्टीला राम राम करणारी सना खान दुसऱ्यांदा झाली आई, पहिल्यांदाच दाखवली लेकाची झलक, नाव ठेवलं एकदम खास, अर्थ आहे…

यावर अरमान पुढे म्हणतो, “आतापासून पायल आणि कृतिका दोघेही वेगळ्या प्रकारे दिसून येतील. कृतिका सकाळी कार्यालयात जाईल आणि पायल मुलांना घरी सांभाळेल. आणि मी ब्रॉडकास्ट सांभाळेन”. कृतिकाच्या व्यवसायामुळे आणि पायलच्या संभाळण्यामुळे कृतिकाला ट्रोलिंगचा शिकार व्हावं लागलं आहे. नेटकरी म्हणत आहेत, “कृतिकाने आधीच पायलला तिच्या नवऱ्यापासून दूर नेले आहे आणि आता ती तिच्या व्यवसायापासून दूर जात आहे”.

अरमान मलिकच्या दोन्ही पत्नींमध्ये वादाची ठिणगी, होणार वेगळ्या, youtuber चा मोठा खुलासा, म्हणाला, “आतापासून…”

Tags: Armaan malikArmaan Malik  Wifearmaan malik breaking news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kishore Kumar and Alka Yagnik did not get the award Sonu Nigam shared a video and expressed his displeasurement by sharing video

किशोर कुमार व अलका याज्ञिक यांना पद्म पुरस्कार न मिळाल्याने सोनू निगमची नाराजी, म्हणाला, “अनेक दिवसांपासून कला सिद्ध करत आहेत पण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.