सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुला शिव्या देण्याची सवय आहे”, अनुश्री-प्राजक्तामध्ये पेटला वाद; प्रोमोमधील कॅट फाईट पाहून चाहते उत्सुक

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 30, 2026 | 10:54 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Updates

अनुश्री-प्राजक्तामध्ये पेटला वाद

Bigg Boss Marathi Updates : ‘बिग बॉस’ मराठी सिझन सहा चांगलाच चर्चेत आला आहे. या सिझनमधील सदस्यांमध्ये खूपच वादविवाद होताना दिसत आहेत. आणि त्याचसोबत या सिझनने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. ‘बिग बॉस’ मराठी सीझन ६ च्या आजच्या भागात प्रेक्षकांना मोठा ड्रामा पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये अनुश्री माने आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यात जोरदार शाब्दिक वाद रंगताना दिसत आहे. हा प्रोमो समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आजचा भाग पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

आणखी वाचा – “लघवीत रक्त होतं आणि…”, सुप्रसिद्ध गायकाच्या लेकाला झालेला कॅन्सर, केमोथेरपी आणि ऑपरेशननं आयुष्यच उद्ध्वस्त झालं अन्…

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

प्रोमोच्या सुरुवातीला अनुश्री माने प्राजक्तावर निशाणा साधताना म्हणते, “प्राजक्ताला असं वाटतं की इथल्या काही मुलींचा काहीच क्लास नाही.” यावर प्राजक्ता संतप्त होत उत्तर देते, “कारण तुला शिव्यांची सवय आहे, मला नाही.” यानंतर अनुश्री पुन्हा प्राजक्तावर टीका करत म्हणते, “तो तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू आणि तुझी मानसिकता आहे. तुला हा गेम कळतच नाही आहे.”अनुश्रीच्या या वक्तव्यावर प्राजक्ता शांत पण ठाम शब्दांत प्रत्युत्तर देते, “मी शिकतेय, पण तुझ्यासारखी वाईट होत चाललेली नाहीये.” दोघींमधील हा वाद पाहून घरातील वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. दरम्यान, या प्रोमोवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही प्रेक्षकांनी अनुश्रीची बाजू घेतली आहे, तर काहींच्या मते या वादात प्राजक्ता अनुश्रीवर भारी पडली आहे. अनुश्री आणि प्राजक्ताची ही ‘कॅट फाइट’ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – न्यायालयानं समीर वानखेडेंची याचिका फेटाळली; आर्यन खानविरोधात केला होता मानहानीचा दावा, नेमकं प्रकरण काय?

Tags: Bigg Boss Marathi Updatesentertainmentmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
Next Post
zakir khan break from comedy

सुप्रसिद्ध कॉमेडियनचा कॉमेडीपासून मोठा ब्रेक, 'या' आजाराशी देतोय झुंज, स्वतःच केला खुलासा…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.