सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध कॉमेडियनचा कॉमेडीपासून मोठा ब्रेक, ‘या’ आजाराशी देतोय झुंज, स्वतःच केला खुलासा…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 30, 2026 | 11:12 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
zakir khan break from comedy

सुप्रसिद्ध कॉमेडियनचा कॉमेडीपासून मोठा ब्रेक, 'या' आजाराशी देतोय झुंज, स्वतःच केला खुलासा…

zakir khan break from comedy : कॉमेडियन झाकीर खानने नुकताच अचानक ब्रेक जाहीर केल्यावर त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला. प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आला की, त्याने आपल्या कारकिर्दीच्या इतक्या छान टप्प्यावर ब्रेक का घेतला? कॉमेडियनने ब्रेक घेण्याबाबत सांगितले होते की, तो आता त्याच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करणार आहे. पण आता त्याने याचे खरे कारणही उघड केले आहे. कॉमेडियनने प्रकृतीच्या कारणामुळे कॉमेडीमधून ब्रेक घेतला आहे. कुटुंबातील अनुवांशिक आजारामुळे हे करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. वास्तविक झाकीर खानने अलीकडेच ‘गल्फ न्यूज’शी संवाद साधत ब्रेकचे खरे कारण उघड केले. तो म्हणाला, “मला माझ्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. माझ्या कुटुंबात काही अनुवांशिक आजार आहेत, जे एका विशिष्ट वयानंतर दिसू लागतात. माझ्या शरीरालाही इजा झाली आहे. मी दोन तास झोपतो आणि मग हजारो लोकांना भेटायला जातो, कारण ज्या क्षणी तुम्ही शहरात पोहोचता, त्याच क्षणी तुम्ही लोकांना भेटायला सुरुवात करता”.

इतकं यश मिळालेलं आपण कुटुंबातील पहिली पिढी असल्याचंही झाकीर म्हणाला. अशा परिस्थितीत, भविष्यातील पिढ्यांसाठी गोष्टी योग्यरित्या सेट करण्याची जबाबदारी त्यांना वाटते. झाकीर म्हणाला की, मला आपल्या भावी पिढीसाठी काही पूल बांधायचे आहेत. त्यांनी कबूल केले की या भावनेनेच त्यांना जवळजवळ एक दशकापर्यंत सर्व गोष्टींवर काम करण्याची प्रेरणा दिली. हा त्यांचा निर्णय होता, ज्याचा परिणाम आता त्यांच्या शरीरावर दिसू लागला आहे.

आणखी वाचा – आम्ही घटस्फोट घेतला पण…”; राकेश बापटसोबतच्या घटस्फोटानंतर रिद्धी डोगरा व्यक्त, म्हणाली, “जोडीदार म्हणून योग्य नाही…”

View this post on Instagram

A post shared by Zakir Khan (@zakirkhan_208)

तो पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही सतत दहा वर्षे ॲक्सिलेटरवर पाय ठेवता, तेव्हा त्याचा शरीरावर नक्कीच परिणाम होतो. त्यामुळे मला सुरुवातीला वाटले होते की, कामाबरोबरच मी माझी तब्येतही सांभाळेन, पण गेल्या वर्षी आम्ही अमेरिकेत असताना एकाच वेळी हे दोन्ही करणे शक्य होणार नाही, हे लक्षात आले. तेव्हाच मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला”. सोशल मीडियावर झाकीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कॉमेडियन २०३० पर्यंत स्टँड-अप कॉमेडीपासून दूर राहणार असल्याचे सांगत आहे. मुलाखतीत झाकीरने स्पष्ट केले की हे विशेषतः हैदराबादसाठी आहे, कारण त्याला हैदराबादला परतण्यास वेळ लागेल जेव्हा तो विश्रांती घेतील आणि नंतर पुन्हा काम सुरु करेल.

आणखी वाचा – “तुला शिव्या देण्याची सवय आहे”, अनुश्री-प्राजक्तामध्ये पेटला वाद; प्रोमोमधील कॅट फाईट पाहून चाहते उत्सुक

गेल्या आठवड्यात झाकीरने कॉमेडीमधून दीर्घकाळ ब्रेक घेणार असल्याचे सांगितले होते. त्याच्या चालू असलेल्या ‘पापा यार’ टूरचा एक भाग म्हणून हैदराबादमध्ये नुकत्याच झालेल्या लाइव्ह शोमध्ये ही घोषणा करण्यात आली. तो म्हणाला की त्याचा ब्रेक अनेक वर्षे टिकू शकतो आणि त्याची वर्तमान वचनबद्धता पूर्ण झाल्यानंतर २०२८, २०२९ किंवा २०३० पर्यंत वाढू शकते. मात्र, हे विशेषत: हैदराबादसाठी असल्याचे आता कॉमेडियनने स्पष्ट केले आहे. त्याचा ब्रेक इतका लांब नसेल. तो म्हणाला, “मी निरोगी राहण्याचा प्रयत्न करेन. मी यावर काम करत आहे. मला माझे काम खूप आवडते. मला ८० पर्यंत स्टँड-अप करायचे आहे. त्याच्यासाठी निरोगी राहणे महत्वाचे आहे”.

Tags: comedianzakir khanzakir khan big news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Maya Marathi Movie

'चारचौघी' नाटकानंतर माय-लेकीची जोडी 'माया' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर, दोघींचाही कुल अंदाज भावला आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.