मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“व्यक्तीसोबत जवळीक साधली तरच रोल” ‘बिग बॉस’ विजेता गौरव खन्नाच्या पत्नीने उघड केला इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचचा अनुभव

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 28, 2026 | 5:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aakansha Chamola On Casting Couch

आकांक्षा चामोलाने सांगितला 'कास्टिंग काऊच'चा अनुभव

Aakansha Chamola On Casting Couch : टीव्ही इंडस्ट्रीत काम करताना पडद्यामागे नेमकं काय घडतं?, याबद्दल अभिनेत्री आकांक्षा चामोला हिने नुकतंच स्पष्टपणे मत व्यक्त केलं आहे. सध्या तिची ‘दिल धोखा और डिझायर’ ही वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. त्यातील तिच्या बोल्ड भूमिकेमुळे ती चर्चेत आहे. या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत तिने इंडस्ट्रीमधील कास्टिंग काउचसारख्या विषयावर भाष्य केलं. ‘बिग बॉस’ १९ चे विजेते गौरव खन्ना यांची पत्नी म्हणूनही आकांक्षा ओळखली जाते. मात्र, तिने स्वतःच्या अनुभवांबद्दल बोलताना स्पष्ट केलं की, “कास्टिंग काउच हा शब्द जरी थेट वापरला गेला नाही, तरी तो मुद्दा अनेकदा समोर येतो. काही वेळा गोष्टी अगदी उघडपणे सांगितल्या जातात.”

‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत आकांक्षाच्या मते, टीव्ही इंडस्ट्री तुलनेने सुरक्षित वाटते. पण जर एखाद्याला वेगळ्या आणि मोठ्या संधींचा शोध घ्यायचा असेल, तर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते. “जर तुमच्या पाठीशी प्रभावशाली व्यक्ती नसेल, तर प्रवास अधिक कठीण होतो,” असं ती म्हणाली. मिटिंगदरम्यान घडलेल्या काही अनुभवांबद्दल सांगताना आकांक्षाने नमूद केलं की, काही वेळा ऑडिशनऐवजी कराराच्या अटींचा उल्लेख करून दबाव टाकला जातो. “जर तुम्ही ठराविक व्यक्तीच्या जवळ गेलात, तर तुम्हाला भूमिका मिळू शकते,” असं स्पष्ट शब्दांत सांगितल्याचा अनुभव तिने शेअर केला.

आणखी वाचा – साऊथ सुपरस्टारचा २७ वर्षांचा संसार मोडला, दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर अफेअर म्हणत पत्नीचे गंभीर आरोप

View this post on Instagram

A post shared by Akanksha Chamola (@akankshagkhanna)

तिच्या मते, हे प्रकार फार सहजपणे घडतात आणि आजही घडत आहेत. या सगळ्या अनुभवांनंतर इंडस्ट्रीकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन बदलल्याचंही ती म्हणाली. दोन वेळा अशा परिस्थितीला सामोरं गेल्यानंतर तिला या गोष्टी किती उघडपणे घडतात याची जाणीव झाली. कामाबद्दल बोलायचं झालं तर आकांक्षाने ‘भूतू’ आणि ‘स्वरागिनी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आता नव्या वेब सिरीजमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, तिच्या या वक्तव्यामुळे इंडस्ट्रीतील पडद्यामागील वास्तवावर चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा – Video : लग्नानंतर पहिल्यादांच कॅमेरासमोर आलं नवविवाहित जोडपं, रश्मिका-विजयच्या चेहऱ्यावरील ग्लोची चर्चा

Tags: Aakansha Chamola On Casting Couchbollywood newsentertainment
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Pushkar Shrotri Father Death

सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्रीला पितृशोक, वृद्धापकाळाने ८९व्या वर्षी वडिलांचे निधन, ६५ वर्ष वृत्तपत्र वितरण व्यवस्थेत केलंय काम

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.