बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्रीला पितृशोक, वृद्धापकाळाने ८९व्या वर्षी वडिलांचे निधन, ६५ वर्ष वृत्तपत्र वितरण व्यवस्थेत केलंय काम

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 2, 2026 | 10:20 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pushkar Shrotri Father Death

सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्रीला पितृशोक, वृद्धापकाळाने ८९व्या वर्षी वडिलांचे निधन, ६५ वर्ष वृत्तपत्र वितरण व्यवस्थेत केलंय काम

Pushkar Shrotri Father Death : सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याचे वडील सुधाकर श्रोत्री यांचे निधन झाले आहे. विलेपार्ले येथील निवासस्थानी रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुधाकर श्रोत्री यांनी वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील ज्येष्ठ आणि मान्यवर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख मिळवली. त्यांच्या निधनाने वृत्तपत्र वितरण क्षेत्रासह सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातही हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवार, २ मार्च रोजी सकाळी ८ वाजता विलेपार्ले येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

सुधाकर श्रोत्री यांनी तब्बल ६५ वर्षे टाइम्स वृत्त समूहात काम करत वृत्तपत्र वितरण व्यवस्थेचा भक्कम पाया घालण्यामध्ये मोलाचे योगदान दिले. प्रत्येक राज्य आणि तालुक्यातील वृत्तपत्रविक्रेते आणि एजंट यांची नावे तोंडपाठ असणं हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे. सुधाकर श्रोत्री यांनी वृत्तपत्र क्षेत्रातील कामाबरोबरच साहित्याचीही आवड जोपासली. त्यांनी अनेक कविता लिहिल्या असून, त्यांच्या ‘वडिलोपार्जित’, ‘लेडीज स्पेशल’ आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यावर आधारित ‘खास सचिन’ या कविता संग्रहांचे प्रकाशन झाले आहे.

आणखी वाचा – “व्यक्तीसोबत जवळीक साधली तरच रोल” ‘बिग बॉस’ विजेता गौरव खन्नाच्या पत्नीने उघड केला इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचचा अनुभव

आपल्या जडणघडणीत वडिलांचा मोलाचा वाटा असल्याचं अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी अनेक वेळा मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. वडिलांच्या जाण्याने पुष्कर यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags: marathi actorpushkar shrotri
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Dipika kakar health update

"खूप कठीण होतं", कॅन्सर, सिस्टच्या शस्त्रक्रियेनंतर लोकप्रिय अभिनेत्रीची वाईट अवस्था, स्वतःच म्हणाली, "खूप घाबरलेय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.