Shiv Thakare Video : बऱ्याच जणांचं त्यांच्या आजीबरोबर खास बॉण्ड असलेलं पाहायला मिळतं. सर्वसामान्यांप्रमाणे विशेषतः कलाकार मंडळी आजीबरोबरच खास नातं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करताना दिसतात. अशातच नेहमीच चर्चेत असलेली आजी-नातवाची जोडी म्हणजे शिव ठाकरे आणि त्याची आजी. शिव सोशल मीडियावरुन नेहमीच त्याच्या आजीबरोबरचे अनेक व्हिडीओ शेअर करताना दिसतो. या व्हिडीओमधून शिव व त्याच्या आजीचं खास बॉण्ड पाहायला मिळतं. आता शिवने त्याच्या आजीच्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. यामध्ये शिवने अगदी दणक्यात आजीबरोबर तिचा वाढदिवस साजरा केला आहे.
बिग बॉस’विजेता शिव ठाकरेने ‘बिग बॉस’मध्ये असल्यानंतर आणि नंतरही अनेकांच्या मनावर राज्य केले. आज जगभरात शिव ठाकरेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. नेहमीच माणुसकी जपत इतरांच्या मदतीला धावून येणारा आणि सच्चेपणाने वागणाऱ्या शिवने साऱ्यांची मन जिंकली. वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शिव सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. अशातच शिवने त्याच्या आजीचा वाढदिवस मुंबई नगरीत साजरा केला असल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा – नवा व्यवसाय की आणखी काही?, मृणाल दुसानिसची नवी सुरुवात, शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा, नेटकरी म्हणाले…
शिवने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला आजीच्या हाताला धरुन शिव तिला गाडीत बसवताना दिसत आहे. हा प्रवास ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या दिशेने सुरु होते. बांद्रा सी-लिंकवर पोहोचताच त्याची आजी खूप खुश होते. पुढे, ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या समुद्राजवळ शिव ठाकरे आजीला बोटीवर नेतो आणि केक कापून तिचा समुद्राच्या मध्यभागी बोटीवर तिचा वाढदिवस साजरा करतो. आजीच्या वाढदिवसासाठी संपूर्ण बोटीवर सजावट केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. केक कापल्यावर शिव व आजी एकमेकांना मिठी मारतात.
आणखी वाचा – “हलक्यात घेऊ नका”, सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून पुन्हा धमकी, केली ‘इतक्या’ कोटींची मागणी अन्…
बोटीवर केक कापल्यावर शिव आपल्या आजीला पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जातो. ताज हॉटेल पाहण्याची आजीची इच्छा तो पूर्ण करतो. तर, त्यानंतर दोघंही मुंबई दर्शन करतात. या व्हिडीओमध्ये शिव व त्याच्या आजीचं सुंदर असं बॉण्डिंग पाहायला मिळत आहे. शिव व त्याच्या आजीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.