‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. यापैकीच एक कलाकार म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद खांडेकरने आजवर आपल्या विनोदी अभिनयाने, विनोदाच्या उत्तम टायमिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच प्रसाद उत्तम दिग्दर्शक म्हणूनही काम करताना पाहायला मिळत आहे. अभिनयासंबंधी तो नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. इतकंच नव्हे तर तो कुटुंबाबरोबरच्या पोस्टही नेहमीच शेअर करताना दिसतो. (Prasad Khandekar On Wife)
कामाच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढून प्रसाद त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना वेळोवेळी पाहायला दिसला आहे. अशातच प्रसादने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसादने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायकोला सरप्राईज गिफ्ट म्हणून बाईक दिली होती. आता ही बाईक घेऊन त्याची बायको त्याच्या गाडीसमोर आलेली असताना त्याने हा व्हिडीओ बनवला आहे.
प्रसादने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायकोला सरप्राईज दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर केला होता. प्रसादने त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बाईक गिफ्ट दिली आहे. आणि हे गिफ्ट तिच्यासाठी सरप्राईज असल्याचंही सांगितलं. या व्हिडीओमध्ये प्रसाद त्याच्या बायकोच्या डोळ्यावर हात ठेवून तिला बाहेर घेऊन आला. बाहेर आल्यानंतर समोर उभी असलेली बाईक ही तिची असल्याचं प्रसाद सांगताना दिसला. ते पाहून त्याच्या पत्नीला खूप आनंद झालेला पाहायला मिळाला.
ही सरप्राइज म्हणून दिलेली भेटवस्तू घेऊन जेव्हा त्याची बायको गाडीसमोर येतो तेव्हा तो हॉर्न वाजवून तिला खुणावतानाचा व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे. “जेव्हा बायकोची बाईक अचानक आपल्या गाडीसमोर येते तेव्हा, हॉर्न ओके प्लिज”, असं गमतीशीर कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या फनी व्हिडीओला प्रेक्षकांची पसंती मिळताना पाहायला मिळत आहे.