एके काळची सुपरहिट मालिका ‘ये है मोहब्बतें’ मध्ये इशिता भल्ला हे पात्र साकरुन घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या अभिनयासोबतच लोकांना तिची स्टाइलपण खूप आवडते. ‘ये है मोहब्बतें’मुळे तिला तुफान लोकप्रियता मिळालेली. याशिवाय रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्येही ती धोकादायक स्टंट करताना दिसली होती. आजवर तिने मोठा संघर्ष करतव इथवरचा पल्ला गाठला आहे. पण या संघर्षाच्या काळात तिला एका व्यक्तीने फसवले होते. एका व्यक्तीकडून दिव्यांकाची तब्बल १२ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. याबद्दल स्वत: अभिनेत्रीने नुकत्याच एका मुलाखतीमधून भाष्य केलं आहे. (divyanka tripathi cheated 12 lakh rs)
दिव्यांका त्रिपाठीने ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘बनू में तेरी दुल्हन’ हा माझा पहिला शो होता. त्यांच्या सेटवर एक सीए सर होते. जे आमच्या सेटवर इतर कलाकारांचा हिशोब सांभाळत असे. हा त्या काळातील घोटाळा होता. माझी फसवणूक झाली. दोन वर्षे त्यांनी माझी चांगली काळजी घेतली. मी २०-२० आणि २४-२४ तास काम करायचे. त्यामुळे इतर कोणत्याही सीएकडे जाऊन चौकशी करायलाही मला वेळ मिळाला नाही. त्यांनी माझ्याकडून काही एफडी केल्या. ते म्हणायचे की, मॅडम तुम्ही अजिबात खर्च करत नाही. तुम्हाला द्यायला लागणाऱ्या करांचे काय होईल? आणि वेळ नसल्यामुळे मला ते खर्चही करता येत नव्हते हे सत्य होते”.
यापुढे तिने सांगितले की, “मी बँकेच्या नावाने चार चेक्सवर सह्या केल्या. याशिवाय काही फॉर्मही भरले, ज्यात माझे नाव सर्वात वर आणि बँकेचे नाव खाली होते. बाकीची पाने कोरी होती. तर ते म्हणाले बाकीची माहिती मी भरेन. काळजी करू नका. त्यामुळे दोन-तीन ठिकाणी मी माझं नाव भरले आणि स्वाक्षरी केली. पुढे तो माणूस अचानक गायब झाला. १२ लाख रुपये होते. त्यावेळी माझी कमाईही खूपच कमी होती. दोन वर्षात मी जे काही कमावले होते ते १२ लाख रुपये त्याच्याबरोबर गायब झाले. त्यानंतर मी त्याला फोन करत राहिली. पण काही झाले नाही”.
आणखी वाचा – ‘बालवीर’ फेम अभिनेत्याची लगीनघाई, नुकताच पार पडला साखपुडा, व्हिडीओमध्ये दिसली संपूर्ण झलक
यापुढे अभिनेत्री म्हणाली की, “मोठ्या कष्टाने मी एका मित्राला त्याच्या शहरात पाठवले आणि कसेतरी त्याच्याकडून चार चेक काढून घेतले. परंतु त्यापैकी तीन चेक बाऊन्स झाले आणि फक्त एकाच चेकचे पैसे मिळाले. त्यामुळे माझी नऊ लाख रुपयांची फसवणूक झाली. मी त्यांच्यावर चेक बाऊन्स झाल्याचा गुन्हा दाखल केला. यासाठी माझे वडील भोपाळहून माझ्या घरी यायचे. त्यांनी केस लढवली, कारण मी शूटिंगमध्ये व्यस्त होते. पण तिथे जो वकील होता तो विकला गेला होता. मग एके दिवशी सकाळी त्याने फोन करून सांगितले की मॅडम, तुमच्या सर्व फाईल्स गायब झाल्या आहेत आणि शेवटी आम्ही पराभव स्वीकारला”