अनंत-राधिका यांच्या लग्नात देशविदेशातून अनेक पाहुणेमंडळी आली होती. केवळ बॉलिवूडचं नव्हे तर हॉलिवूडच्याही अनेक कलाकारांनी या शाही लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी हॉलिवूड स्टार व WWE कुस्तीपटू जॉन सीनादेखील या लग्न सोहळ्याला उपस्थित होता. १२ जुलै त्याने या लग्नात हजेरी लावली होती आणि त्याने लग्नात अगदी धमाल केली. त्याला भारतीय कपड्यांमध्ये पाहून चाहतेही चांगलेच प्रभावित झाले. इतकेच नाही तर जॉन सीनाने डोक्यावर फेटा बांधून लग्नाच्या वरातीत भरपूर डान्सही केला. या लग्नात त्याला अंबानी कुटुंबाकडून मिळालेल्या आदरातिथ्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
मायदेशी परतल्यानंतर जॉन सीनाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली, ज्यामध्ये त्याने अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाला उपस्थित राहण्याचा अनुभव शेअर केला आहे. तसेच शाहरुखमुळे त्याच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झाला असल्याचेही त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. जॉन सिनाने एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर राधिका व अनंत यांच्या लग्नातील फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “२४ तास हे माझ्यासाठी खूप सुखावणारे तास होते. अंबानी कुटुंबियांच्या अतुलनीय प्रेमळपणा व आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे”.
A surreal 24 hours. So grateful for the Ambani family for their unmatched warmth and hospitality.
— John Cena (@JohnCena) July 13, 2024
An experience filled with so many unforgettable moments which allowed me to connect with countless new friends, including meeting @iamsrk and being able to tell him personally the… pic.twitter.com/MNRb29cFuV
आणखी वाचा – अंबानींचा नादच नाय! लग्नात आलेल्या पाहुण्यांना दिल्या महागड्या भेटवस्तू, किंमती ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
यापुढे त्याने शाहरुखचा उल्लेख करत असं म्हटलं की, “मला असंख्य नवीन मित्रांशी संपर्क साधण्याची संधी दिली. यामध्ये शाहरुख खानचाही समावेश आहे. माझ्या जीवनावर त्याचा काय सकारात्मक प्रभाव पडला आहे हे त्याला वैयक्तिकरित्या वैयक्तिकरित्या सांगू शकलो”. जॉन सीनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून अनेकजण या लग्नातील त्याच्या लुकचे कौतुक करत आहेत.
दरम्यान, राधिका-अनंतच्या लग्नात जॉन सीना व्यतिरिक्त अनेक परदेशी सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यामध्ये किम कार्दशियन, कोल कार्दशियन, नायजेरियन गायिका रीमा आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या नावांचा समावेश आहे.