सोशल मीडिया जगभरातील माहिती मिळवण्याचं प्रभावी माध्यम आहे. सकारात्मक गोष्टी या माध्यमातून बऱ्याच व्हायरल होतात. इतकंच काय तर नकारात्मक गोष्टींचा भडीमारही सोशल मीडियावर होतो. आता असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. गर्लफ्रेंडवर जीवापाड प्रेम असणाऱ्या तरुणाने सगळ्या मर्यादाच ओलांडल्या. मात्र या प्रेमामुळे त्याला चांगलीच शिक्षा झाली आहे. ज्या गर्लफ्रेंडवर तो जीवापाड प्रेम करत होता ती लग्न झालेली मुलगी आहे. मात्र लग्न झालेलं भान ना त्या मुलीला होतं ना त्या तरुणाला… हा पठ्ठ्या थेट लग्न झालेल्या गर्लफ्रेंडच्या घरी लपून पोहोचला. मात्र त्यानंतर जे घडलं ते फार भयंकर होतं. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईलच. (husband wife viral video)
गर्लफ्रेंड विवाहित असूनही तिसऱ्या व्यक्तीला फसवून वाईट कृत्य करणं खरंच लज्जास्पद आहे. तरुणीने दुसऱ्याच व्यक्तीबरोबर लग्न केलं. मात्र प्रियकराला ती विसरु शकली नाही. ही घटना अत्यंत लाजीरवाणी आहे. फतेहाबादमध्ये राहणाऱ्या तरुणीने विचार न करता नको तेच पाऊल उचललं. रात्री घरातील सगळीच मंडळी टेरेसवर झोपले असताना तिने डाव साधला. तरुणीने प्रियकर अजयला तिच्या सासरीच बोलावून घेतलं.
अजय चोर वाटेने भिंतीचा आधर घेत घरात शिरला. काही गावकऱ्यांनी त्याला पाहिला. ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. तरुणीच्या कुटुंबापर्यंत ही माहिती गावकऱ्यांनी पोहोचवली. कुटुंबानेही याची दखल घेत तरुणीचा पती टेरेसवरुन घरात आला. रुमचा दरवाजा त्याने ठोकवला. तरुणीने प्रियकर अजयला कपड्यांच्या पेटीमध्ये लपवलं. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला संशय होता. त्यामुळे संपूर्ण रुमभर तरुणाला शोधण्यात आलं. हाती काहीच मिळालं नाही म्हणून पतीची नजर कपड्यांच्या पेटीकडे गेली. ती पेटी उघडताच अजय अर्ध्या कपड्यांमध्येच पेटीत लपला होता.
आगरा मे आधी रात शादीशुदा प्रेमिका के बुलावे पर उसके घर पहुंचे आशिक़ की जबरजस्त धुलाई ।
— Prof Sudhanshu 🚩 (@ProfSudhaanshu) April 22, 2025
कमरे से आवाज आने पर घरवालों को शक हुआ। उन्होंने दरवाजा खटखटाया तो महिला ने प्रेमी को संदूक में छिपा दिया, घरवालों ने उसे पूरे कमरे में खोजा, मगर वह नहीं मिला।
इसी बीच महिला के पति की नजर… pic.twitter.com/r0niFxM74q
आणखी वाचा – ३६व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या, राहत्या घरी मृत अवस्थेत पाहिल्यानंतर…; कुटुंब हादरलं
अजयला कुटुंबाकडून तसेच तरुणीच्या पतीकडून मारहाण करण्यात आली. अजय नावाच्या एका युजरकडून हा व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आला आहे. तसेच इतरही सोशल मीडिया पेजवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तरुणीच्या दीराने अजयविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिस अधिकारी डीपी तिवारी यांनी सांगितलं की, “तरुण त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी लपून घरात शिरला. या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही तपास करत आहोत”. पण ही लज्जास्पद घटना प्रेमासारख्या सुंदर नात्याला काळीमा फासणारी आहे.