मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझा गळा का दाबतोय…” पहिल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये तुफान राडा, विशाल–ओमकारमध्ये हाणामारी; वादाने घरात गोंधळ

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 15, 2026 | 9:25 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Update

विशाल–ओमकारमध्ये हाणामारी

Bigg Boss Marathi Update : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ च्या घरात पहिल्याच आठवड्यात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. बुधवारी पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कनंतर आता गुरुवारच्या एपिसोडमध्ये पहिला कॅप्टन्सी टास्क खेळवण्यात येणार असून, त्यासाठी ‘BB फार्म’ नावाचा खास टास्क ठेवण्यात आला आहे. या कॅप्टन्सी टास्कचं नाव ‘कार्य कॅप्टन्सीचे, झुंज समर्थकांची’ असं असून, याच टास्कमधून ‘बिग बॉस’ मराठी ६ चा पहिला कॅप्टन ठरणार आहे. नॉमिनेशन टास्कदरम्यान बिग बॉसने आणलेल्या एका अनपेक्षित ट्विस्टमुळे पॉवर की असूनही शॉर्टकट दरवाजाने घरात आलेले तीन सदस्य थेट नॉमिनेट झाले. तर तन्वी, सोनाली आणि प्राजक्ता या तिघी जणी कॅप्टन्सीच्या शर्यतीत पुढे आल्या आहेत.

या तिघींपैकी पहिला कॅप्टन ठरवण्यासाठी ‘BB फार्म’ हा टास्क खेळवण्यात येणार आहे. या टास्कमध्ये घरातील इतर सदस्य त्यांच्या समर्थकांच्या मदतीने हा टास्क पार पडणार आहे. ज्या सदस्यांचा ज्या कॅप्टन दावेदाराला पाठिंबा आहे, ते त्या दावेदारासाठी फार्ममधील वस्तू गोळा करताना दिसणार आहेत. दरम्यान, कलर्स मराठीने शेअर केलेल्या ‘BB फार्म’ कॅप्टन्सी टास्कच्या पहिल्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोमध्ये विशाल कोटियन आणि ओमकार राऊत यांच्यात जोरदार वाद होताना दिसत आहे. टास्कदरम्यान ओमकारच्या हातातील वस्तू घेण्यासाठी विशाल त्याला अडवतो आणि याच क्षणी दोघांमधील वाद होतो. (Bigg Boss Marathi Update)

आणखी वाचा – “लोक पैसे मागायला यायचे तेव्हा…”; ‘बिग बॉस’च्या घरात करणने सांगितलं भावुक प्रसंग, म्हणाला, “पैशाने आनंद विकत घेता येतो…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

प्रोमोमध्ये विशालने गळा पकडल्याचा आरोप करत ओमकार जोरात ओरडताना दिसतो. “गळा सोड ना यार, गळा सोड… माझा गळा का दाबतोयस?” असं म्हणत तो संताप व्यक्त करतो. कसाबसा स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद होतो. ओमकार अधिक भडकताना दिसतो, तेव्हा आयुष संजीव आणि दिव्या शिंदे दोघांमध्ये उभे राहून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करतात. “तू आधीच गळा दाबलेला होता,” असं ओमकार विशालला म्हणतो. त्यावर विशाल,“तू मारणार का?” असा सवाल करतो. या साऱ्या प्रकारामुळे ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात पहिल्याच कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा वाद रंगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता या वादाचा खेळावर आणि कॅप्टन्सीच्या निकालावर नेमका काय परिणाम होणार?, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. (Bigg Boss Marathi Update)

आणखी वाचा – “माझ्या स्वप्नांशी खेळू नकोस…”; ‘पॉवर की’ला हलक्यात घेणं रुचिताला भारी पडणार, ‘बिग बॉस’च्या घरात तिसऱ्या दिवशी धोक्याची घंटा

Tags: bigg boss marathi 6 promoBigg Boss Marathi Updatemarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Bigg Boss Marathi 6 Nomination Task

नॉमिनेशनमध्ये ‘पॉवर की’चा खेळ, पहिल्याच आठवड्यात 'हे' ९ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट, 'त्या' ट्विस्टमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.