लोकप्रिय अभिनेते दिलीप जोशी यांच्या घरी लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून छोटासा ब्रेक घेत जेठालाल सध्या त्याच्या कुटुंबियांसह वेळ घालवताना दिसत आहे. जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्या लेकाचे म्हणजेच ऋत्विक जोशीचे नुकतेच लग्न झालं आहे. दिलीप यांच्या लेकाच्या लग्नातील व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिलीप जोशी यांचा मुलगा ऋत्विकचं १७ डिसेंबर रोजी विधिवत लग्न पार पडलं. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटोस सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. (Dilip Joshi Son Wedding)
दिलीप जोशी यांच्या लेकाच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओही समोर आले आहेत. सर्व लग्न विधीवत पार पडले आहेत. दिलीप जोशी यांच्या मुलाच्या लग्नाला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. तसेच दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी ही अनेक वर्षांपासून या मालिकेपासून दूर होती. तिने देखील ऋत्विकच्या लग्नात हजेरी लावली होती. अभिनेत्याच्या सूनेचा मेहेंदी काढतानाचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दिलीप जोशी यांच्या सूनेचं नाव उन्नती गाला आहे. दिलीप जोशी यांची सून व मुलगा नेमकं काय काम करतात असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. ऋत्विकची पत्नी म्हणजेच उन्नती गालाबद्दल बोलायचे तर ती व्यवसायाने एक अभिनेत्री आहे. तसेच ती गुजराती कुटुंबातून आहे. उन्नती ही गुजराती थिएटर आर्टिस्ट आहे. गुजराती नाटकांमध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.
तसेच दिलीप जोशी यांचा मुलगा ऋत्विक जोशी हा देखील अभिनेता आहे. ‘धमाका’ या चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तो उत्तम पटकथा लेखकही आहे. मुलाच्या लग्नात दिलीप जोशी यांनी शेरवानीसह गुलाबी पगडी परिधान केली होती. सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटो, व्हिडीओंवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.