टेनिसपटू सानिया मिर्झापासून घटस्फोट घेतल्यानंतर माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसह तिसरे लग्न केले आहे. या जोडप्याने २० जानेवारी रोजी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान, आता बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुखचा व्हिडीओ समोर आला आहे. शाहरुखच्या या व्हिडीओमध्ये सानिया व शोएब दिसत आहेत. (Sania Mirza and Shoaib Malik Divorce)
समोर आलेल्या व्हिडीओत शाहरुखने सानियाला असा काही प्रश्न विचारला ज्यामुळे तो व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ कोणत्या एका इव्हेंट किंवा अवॉर्ड शोचा असल्याचं कळतंय. शाहरुखने सानियाला विचारले की, शोएबमध्ये तिने असे काय पाहिले ज्यामुळे तिचे त्याच्याशी लग्न केले. आता या प्रश्नावर सानियाने काय उत्तर दिले हे पाहणं रंजक ठरलं.
शाहरुख शोएबकडे बोट दाखवत सानियाला विचारतो, “खरं सांग, तू याच्यामध्ये असं काय पाहिलं की तू पटकन त्याच्याशी लग्न केलंस. हा देखणा आहे, खेळ देखील ठिकठाक खेळतो. सर्व काही चांगले आहे पण शोएबची अशी कोणती वैयक्तिक गोष्ट जास्त भावली?”, यावर सानियाने उत्तर दिले की, “मी तर खूप काही पाहिले त्यांच्यात, ते खूप लाजाळू आहेत, कसं बोलावं हे तुम्हाला त्यांना शिकवावं लागेल. यावर शाहरुख गमतीत म्हणताना दिसत आहे की, “मी ते करेन. मी जुळवून घेईन”.
यानंतर शाहरुख खानने शोएबला विचारले, “तुला सानियात असे काय आवडले की तू तिच्या प्रेमात पडलास?” यावर उत्तर देताना शोएब म्हणताना दिसत आहे की, “मला हा विचार करायला वेळ मिळण्यापूर्वीच लग्न झाले होते”. सानिया मिर्झा व शोएब मलिक यांनी २०१० मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या ८ वर्षानंतर सानियाने इझानला जन्म दिला. दरम्यान, शोएब व सानिया यांचा घटस्फोट झाल्यानंतर दोघांनी त्यांच्या मुलाचा सांभाळ एकत्र करण्याचं ठरवलं असल्याचं समोर आलं आहे.