‘स्टार प्रवाह’ वाहिनी गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेली आहेत. या वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या बऱ्याच पसंतीस उतरताना दिसत आहेत. टीआरपीच्या शर्यतीत ही वाहिनी अव्वल स्थानावर आहे. या वाहिनीवरील अनेक मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. त्यातील ‘ठरलं तर मग’ ही मालिकेची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी ही मालिका सुरु झाली. तेव्हापासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. गेली अनेक दिवस ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वलस्थानी आहे. अशातच, या मालिकेने टीआरपी रेटिंग्समध्ये एक नवा विक्रम रचला आहे. (Tharla tar Mag Record-break TRP ratings)
‘ठरलं तर मग’ मालिकेची कथा अनाथाश्रमात वाढलेली सायली व नामवंत वकील अर्जुन यांच्यावर आहे. काही कारणांमुळे या दोघांना कोर्ट मॅरेज करावं लागतं. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये होत असलेली मैत्री, त्यांच्यात हळूहळू फुलत असलेलं प्रेम प्रेक्षकांना चांगलंच भावलं आहे. केवळ सायली व अर्जुन नव्हे, तर रविराज, पूर्णा आजी, प्रिया,अस्मिता या सर्वच कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी सायलीच्या भूमिकेत, तर अभिनेता अमित भानुशाली अर्जुनच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तसेच, ज्योती चांदेकर, शिल्पा नवलकर, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दाभाडे, सागर तळाशीकर आदी प्रमुख भूमिकेत दिसत आहे.
हे देखील वाचा – “निर्मात्याबरोबर एक रात्र…”, अंकिता लोखंडेचा पहिल्यांदाच धक्कादायक खुलासा, म्हणाली, “त्याने माझा हात…”
मालिकेची कथा व कलाकारांच्या अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली असून गेली अनेक दिवस ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. अशातच या मालिकेने टीआरपी रेटिंग्समध्येही आपला डंका वाजवला आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेने ७.४ रेटिंग्स मिळवत नवा विक्रम रचला आहे. मालिकेला रेकॉर्डब्रेक रेटिंग मिळाल्यानिमित्त मालिकेच्या संपूर्ण टीमने सेटवर एकत्र येत हे यश साजरं केलं आहे.
जुईने या धम्माल यशाचं व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, मालिकेतील सर्व कलाकार व अन्य टीम केक कटिंग आणि धमाल डान्स करताना दिसत आहेत. तिच्या या पोस्टवर सुचित्रा बांदेकर, तेजश्री प्रधान यांच्यासह मालिकाविश्वातील अनेक कलाकारांनी संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे.
सध्या मालिकेत एक गोड ट्रॅक पाहायला मिळत आहे. सायलीवर झालेल्या हल्ल्यानंतर अर्जुन व तिचं नातं आता आणखी अधिक घट्ट होताना दिसत आहे. इतकेच नव्हे, तर सायलीला आपली बायको म्हणून स्वीकारण्यास तो तयार झाला आहे. त्यामुळे सायली व अर्जुन एकत्र येणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहेत.