Archana Puran Singh Angry On Daughter In Law: अभिनेत्री अर्चना पूरन सिंग हिने अनेक सिनेमे आणि शोच्या माध्यमातून चाहत्याच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा’ शोमुळे अर्चना कायम गेस्ट म्हणून दिसते. एवढंच नाही तर, अर्चना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता पुन्हा एकदा अर्चना पूरन सिंग चर्चेत आली आहे. अर्चनाने वर्षभरापूर्वी पती परमीत सेठी आणि दोन मुले आर्यमन आणि आयुष्मान सेठी यांच्याबरोबर ‘आप का परिवार’ व्लॉग करायला सुरुवात केली होती. या व्लॉगला एक वर्ष पूर्ण झाल्याने अर्चना पूरन सिंगने आणि तिच्या कुटुंबाने नुकताच ‘आप का परिवार’ या व्लॉगची पहिली अनिव्हर्सरी साजरी केली. यानिमित्त अर्चना पूरन सिंग आणि तिच्या कुटुंबाने इन-हाऊस पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात अर्चनाची होणारी सून योगिता बिहानी देखील सहभागी होताना दिसली. पण यादरम्यान अर्चनाला तिच्या होणाऱ्या सुनेवर राग अनावर झाला.
आणखी वाचा: लग्नानंतर सूरज चव्हाणचा सुरुय सुखी संसार, बायकोने प्रपोज करताच लाजला आणि…; व्हिडीओ समोर
तर या पुरस्कार सोहळाचं सूत्रसंचालन आर्यमनची होणारी पत्नी आणि योगिता बिहानी यांनी केलं. यानंतर योगिता बिहानीने विजेत्यांची घोषणा सुरू केली. यावेळी तिने तिच्या सासू अर्चना पूरन सिंगला ‘आंटी’ म्हटले, पुरस्कार सोहळ्यात अर्चना पूरन सिंगला तिने मंचावर बोलावताना योगिताने आंटी म्हटलं. हे ऐकताच अर्चनाला ती लगेच योगिताच्या कानात कुजबुजत म्हणाली, “ओळख करून देण्याची ही काय पद्धत आहे का? आंटी नाही, मला अर्चना पुरण सिंग म्हण.” असं म्हणत तिने तिच्या होणाऱ्या सुनेला खडेबोल सुनावले. तर यादरम्यान किकू शारदाला मिळालेला पुरस्कार स्वीकारताना किकू शारदाने ‘चॅटजीपीटी’ ला स्वतःसाठी भाषण तयार करण्यास सांगितलं. पण इथेही एआयने अर्चना पुरण सिंगची मस्करी केली. फोन स्पीकरवर एक आवाज आला, “अशा फालतू अवॉर्ड्ससाठी तू आनंदी व्हायला नको…” हे ऐकताच किकू शारदाने त्यांचा फोन बंद केला आणि तेथील उपस्थित मंडळी हसू लागले. (Archana Puran Singh Angry On Daughter In Law)
अर्चना पुरण सिंग व तिच्या कुटुंबाने गोल्ड प्ले बटण मिळाल्याचा आनंद साजरा केला. अर्चनाने करिअर व आयुष्यातील संघर्षाबद्दल भाष्य केलं. “आता मला संघर्षाचे दिवस आठवत आहेत. त्यावेळी नरीमन पॉइंट व मरीन ड्राइव्ह इथे खूप साऱ्या मॉडेलिंग एजेन्सी होत्या. मी मॉडेल व्हायचा प्रयत्न करत होते. तेव्हा आम्ही आमचे फोटो घेऊन एका एजेन्सीतून दुसऱ्या एजेन्सीमध्ये जायचो. कारण तेव्हा फोटो पाठवण्यासाठी कोणतेही तंत्रज्ञान नव्हते,” असं अर्चना म्हणाली. (Archana Puran Singh Angry On Daughter In Law)



