शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महाराष्ट्रीयन ते अगदी स्टायलिस्ट ज्वेलरी फक्त १०० रुपयांपासून मिळणार, लग्नासाठी तर विविध पर्यायही उपलब्ध, कुठे खरेदी कराल?

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 19, 2024 | 6:30 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
jewellery in Budget

दादरमध्ये स्वस्तात मस्त दागिने 'या' ठिकाणी मिळतील

सध्या सर्वत्र लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे सगळ्याच महिलांना नटण्याची एक वेगळीच उमेद निर्माण झाली आहे. महिलांना दागिन्यांची खूप आवड असते. आजवर अनेक दागिन्यांचे हजारो प्रकार बघायला मिळतात. गळ्यातील दागिने, कानातील दागिने, बांगड्या असे अनेकविध दागिने आपण बघतो. तसेच आता दागिन्यांची मोठ्या प्रमाणात व्हारायटी असलेली बघायला मिळते. पण सगळ्यांना परवडतील आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सुंदर असे दागिने कुठे मिळतील त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. तसेच यासाठी कुठे जाता येईल याबद्दल माहिती घेऊया.  (jewellery in Budget)

साडी, ब्लाऊज याची सांगड बसली की प्रश्न येतो तो दागिन्यांचा. मात्र आता बऱ्याच जणी सोन्याच्या दागिन्यांपेक्षा आर्टीफिशियल दागिन्यांना पसंती देताना दिसतात. मात्र हे दागिने तसे दुकानांमध्ये घ्यायला गेले तर खूप महाग मिळतात. तसेच व्हरायटीदेखील कमी असलेली बघायला मिळते. मात्र तुमचा हाच प्रश्न आपण आता दूर करणार आहोत. दादर येथील वैष्णवी आर्ट ज्वेलरी या ठिकाणी स्वस्त पण मस्त अशी दागिन्यांची आरास तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला या ठिकाणी बांगड्या, कानातले, नेकलेस, मंगळसूत्र. कुंदन नेकलेस असे अनेक दगिन्यांचे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील.

आणखी वाचा – गोविंदाचा मुलगा यशवर्धनची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, लवकरच चित्रपट येणार, प्रेक्षकांची पसंती मिळणार का?

या ठिकाणी १०० रुपयांपासून दागिने मिळण्यास सुरुवात होईल. यामध्ये बांगड्यांचा सेट, वेगवेगळ्या प्रकारचे नाजूक नेकलेस विकत घेता येतील. तसेच तुम्ही आत दुकानात प्रवेश केल्यानंतर सुंदर अशी टेंपल ज्वेलरी मिळेल. यांची किंमत ६५० रुपयांपासून सुरु होते. तसेच मोत्याची चिंचपेटीदेखील मिळेल. हे साधारणपणे ३५० रुपयांपासून मिळू शकतील. त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी ब्रायडल सेटदेखील मिळणार आहे. यामध्ये वेगवेगळे रंगदेखील तुम्हाला मिळू शकतील. तसेच तुम्हाला हवे तसे दागिने ऑर्डर करुन मिळू शकतील.

आणखी वाचा – “तो गुंडासारखा…”, ‘रामायण’मध्ये रामाची भूमिका साकारण्यावरुन मुकेश खन्नांचा रणबीर कपूरवर राग, म्हणाले, “पार्टी, दारु पिण्याची…”

दरम्यान यामध्ये तुम्हाला सुंदर असे १ ग्रामचे दागिनेदेखील मिळतील. यासाठी सहा महिन्याची गॅरंटीदेखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे पाहिल्यांदा दागिने पॉलिश करुन घेतल्यास फ्री मिळणार आहे. तसेच इथे लेहंग्यावर घालण्यासाठी सुंदर असे ब्रायडलसेटदेखील कमी किंमतीमध्ये मिळतील. अनेक ट्रेंडिंग असलेले नेकलेसदेखील या ठिकाणी मिळतील. या सर्व दागिन्यांवर १०% ते १५% सवलतही मिळणार आहे. त्यामुळे कोणतीही वाट न बघता लगेचच शॉपिंग सुरु करा. यासाठी तुम्हाला दादर पूर्व येथील वैष्णवी आर्ट ज्वेलरी, १७१, मशीद चाळ,शॉप नंबर २, डीएसपी रोड, हिंदमाता या पत्त्यावर संपर्क साधू शकता.   

Tags: ambani wedding jewelleryindian wedding jewellerywedding jewellery
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bollywood singer, musician and rapper Yo Yo Honey Singh commented on his Alcohol Cigarettes addictions.

नशा, प्रसिद्धीची हवा, मुलींच्या सवयीमुळे आई-वडील, बायकोलाही सोडल्याचं हनी सिंगचं भाष्य, म्हणाला, "गांजाहून घाणेरडी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.