आपल्या रॉक, पॉप आणि रॅप गाण्यांवर तरुणाईला थिरकायला भाग पाडणारा गायक, संगीतकार व रॅपर म्हणजे ‘यो यो हनी सिंग’. हनी सिंहने आपला एक काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे हनी सिंगचा सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग आहे. आजवर त्याने अनेक लोकप्रिय व प्रसिद्ध गाणी देत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे आणि रसिक श्रोत्यांवरील या गाण्यांची मोहिनी कायम आहे. ‘ब्रॉउन रंग’, ‘देसी कलाकार’, ‘सनी सनी’, ‘ब्ल्यू आईज्’, ‘मनाली ट्रान्स’ अशा अनेक लोकप्रिय गाण्यांनी हनी सिंगने श्रोत्यांना मंत्रमुध केलं आहे. मात्र एकेकाळी यश, प्रसिद्धी व लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या हनी सिंहचे आयुष्य व्यसनाने उद्ध्वस्त केले. तो व्यसनांच्या इतका आहारी गेला होता की, यामुळे त्याला अनेक मानसिक व शारीरिक आजारांचाही सामना करावा लागला होता. (Honey Singh on his addictions)
या व्यसनाधीनतेबद्दल त्याने हनी सिंगन एक काही दिवसांपूर्वी लल्लनटॉपमध्ये भाष्य केलं होतं. याबद्दल बोलताना त्याने असं म्हटलं होतं की, “मी तेव्हा वोडकाबरोबरच चरसचेही व्यसन करणे सुरु केलं होतं. ती नशा गांजाहूनही अधिक हानिकारक आहे आणि मी दिवसातून १२-१२ वेळा त्याचे सेवन करायचो. लोकांनी फक्त दोन वेळा तरी त्याचे सेवन केलं तरी त्यांना त्रास होऊ शकतो. पण मी ती नशा दिवसातून १२-१२ वेळा करायचो. मी याचे खूपच व्यसन केले. इतकं केलं की, त्यामुळे माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. ज्या क्षणी सगळं काही उद्ध्वस्त झालं त्याचक्षणी मी ती नशा सोडली. लोकांना वाटतं की, व्यसनमुक्ती केंद्रात वगैरे गेलो. पण नाही. मला एखादे व्यसन सोडायला अजिबातच वेळ लागत नाही”.
आणखी वाचा – “बैलाने उचलून मला फेकलं आणि…”, रेश्मा शिंदेने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “त्याने शिंगाने…”
यापुढे हनी सिंगने असं म्हटलं की, “मी तेव्हा इतका नशेत असायचो की, मला स्वतःचे किंवा माझ्या आजूबाजूचे काहीच भान नसायचे. त्याच काळात मी माझी पत्नी शालिनीपासून दूर जाऊ लागलो. २०११ च्या सुमारास माझे लग्न झाले. लग्नाचे ९-१० महिने सर्व काही ठीक होते. पण नंतर माझ्या डोक्यात प्रसिद्धीची हवा गेली. आई-वडील, शालिनी, बहीण… मी कोणाशीही कसलाच संबंध ठेवला नाही. पैसा, प्रसिद्धी, व्यसनाधीनता आणि मुली यात मी हरवून गेलो होतो”.
दरम्यान, बॉलिवूडचा लोकप्रिय रॅपर हनी सिंग त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिला. बॉलिवूडमध्ये मोठं यश मिळाल्यानंतर, यशाची हवा डोक्यात गेली आणि हनी सिंगचं आयुष्य बदललं होतं. एकेकाळी तो अचानक गायब झाला होता. अशी एक वेळ आली की, हनी सिंग खूपच नैराश्येत होता. तो बायपोलर डिसऑर्डरचा सामना करत होता. त्यामुळे त्याने सिनेइंडस्ट्रीपासून दूर राहणं पसंत केलं होतं.