सध्या सर्वत्र लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे सगळ्याच महिलांना नटण्याची एक वेगळीच उमेद निर्माण झाली आहे. महिलांना दागिन्यांची खूप आवड असते. आजवर अनेक दागिन्यांचे हजारो प्रकार बघायला मिळतात. गळ्यातील दागिने, कानातील दागिने, बांगड्या असे अनेकविध दागिने आपण बघतो. तसेच आता दागिन्यांची मोठ्या प्रमाणात व्हारायटी असलेली बघायला मिळते. पण सगळ्यांना परवडतील आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सुंदर असे दागिने कुठे मिळतील त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. तसेच यासाठी कुठे जाता येईल याबद्दल माहिती घेऊया. (jewellery in Budget)
साडी, ब्लाऊज याची सांगड बसली की प्रश्न येतो तो दागिन्यांचा. मात्र आता बऱ्याच जणी सोन्याच्या दागिन्यांपेक्षा आर्टीफिशियल दागिन्यांना पसंती देताना दिसतात. मात्र हे दागिने तसे दुकानांमध्ये घ्यायला गेले तर खूप महाग मिळतात. तसेच व्हरायटीदेखील कमी असलेली बघायला मिळते. मात्र तुमचा हाच प्रश्न आपण आता दूर करणार आहोत. दादर येथील वैष्णवी आर्ट ज्वेलरी या ठिकाणी स्वस्त पण मस्त अशी दागिन्यांची आरास तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला या ठिकाणी बांगड्या, कानातले, नेकलेस, मंगळसूत्र. कुंदन नेकलेस असे अनेक दगिन्यांचे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील.
या ठिकाणी १०० रुपयांपासून दागिने मिळण्यास सुरुवात होईल. यामध्ये बांगड्यांचा सेट, वेगवेगळ्या प्रकारचे नाजूक नेकलेस विकत घेता येतील. तसेच तुम्ही आत दुकानात प्रवेश केल्यानंतर सुंदर अशी टेंपल ज्वेलरी मिळेल. यांची किंमत ६५० रुपयांपासून सुरु होते. तसेच मोत्याची चिंचपेटीदेखील मिळेल. हे साधारणपणे ३५० रुपयांपासून मिळू शकतील. त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी ब्रायडल सेटदेखील मिळणार आहे. यामध्ये वेगवेगळे रंगदेखील तुम्हाला मिळू शकतील. तसेच तुम्हाला हवे तसे दागिने ऑर्डर करुन मिळू शकतील.
दरम्यान यामध्ये तुम्हाला सुंदर असे १ ग्रामचे दागिनेदेखील मिळतील. यासाठी सहा महिन्याची गॅरंटीदेखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे पाहिल्यांदा दागिने पॉलिश करुन घेतल्यास फ्री मिळणार आहे. तसेच इथे लेहंग्यावर घालण्यासाठी सुंदर असे ब्रायडलसेटदेखील कमी किंमतीमध्ये मिळतील. अनेक ट्रेंडिंग असलेले नेकलेसदेखील या ठिकाणी मिळतील. या सर्व दागिन्यांवर १०% ते १५% सवलतही मिळणार आहे. त्यामुळे कोणतीही वाट न बघता लगेचच शॉपिंग सुरु करा. यासाठी तुम्हाला दादर पूर्व येथील वैष्णवी आर्ट ज्वेलरी, १७१, मशीद चाळ,शॉप नंबर २, डीएसपी रोड, हिंदमाता या पत्त्यावर संपर्क साधू शकता.