बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आम्ही घटस्फोट घेतला पण…”; राकेश बापटसोबतच्या घटस्फोटानंतर रिद्धी डोगरा व्यक्त, म्हणाली, “जोडीदार म्हणून योग्य नाही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 30, 2026 | 10:43 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ridhi Dogra On Raqesh Bapat After Divorce

राकेश बापटसोबतच्या घटस्फोटानंतर रिद्धी डोगरा व्यक्त

Ridhi Dogra On Raqesh Bapat After Divorce : अभिनेता राकेश बापट हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. दरम्यान सध्या तो ‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये सहभागी झाला असून त्याचा ‘बिग बॉसच्या घरातील खेळ प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. राकेश बापट बिग बॉसमध्ये जाण्याअगोदरही त्याने साकारलेल्या भूमिका, सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट याबरोबरच त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील तो अनेकदा चर्चेत असायचा. आता राकेश बापटची पूर्वाश्रमीची पत्नी रिद्धी डोगराने एका मुलाखतीत केलेल्या भाष्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने त्यांच्या लग्नाबद्दल, घटस्फोटाबद्दल, तसेच घटस्फोटानंतर त्यांच्यात असलेल्या मैत्रीबद्दल वक्तव्य केले आहे.

रिद्धीने काही दिवसांपूर्वी बालाजी टेलिफिल्म्सच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यादरम्यान ती राकेश बापटबद्दल बोलताना म्हणाली, “मी आणि माझा एक्स पती राकेश खूप चांगले मित्र आहोत. आम्ही घटस्फोट घेतला आणि आम्ही आमची मैत्री वाचवली आहे. आम्ही एकमेकांसाठी जोडीदार म्हणून योग्य नव्हतो. पण, खूप चांगले मित्र आहोत. एकमेकांची गुपिते गुपितच ठेवतो. एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो”, असे म्हणत रिद्धीने घटस्फोटानंतर राकेशबरोबर उत्तम मैत्री, त्याच्याबरोबर उत्तम बॉण्डिंग असल्याचे सांगितले.
रिद्धी आणि राकेश यांची ‘मर्यादा: लेकिन कब तक’ मालिकेदरम्यान भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी २०११ ला लग्नगाठ बांधली; मात्र २०१९ ला ते वेगळे झाले. दोघांनी विचार करून एकत्रित हा निर्णय घेतला होता. घटस्फोटानंतरही त्यांच्यात खूप चांगले नाते असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते. त्यांच्यातील मैत्री त्यांनी तशीच ठेवली. आजही ते त्यांची मैत्री जपत असल्याचे दिसते. दोघेही विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटतात. (Ridhi Dogra On Raqesh Bapat After Divorce)

आणखी वाचा: जुळ्या मुलींनंतर ही सुप्रिसद्ध अभिनेत्री पुन्हा होणार आई, स्वतःच दिली गुडन्यूज, म्हणाली, “मी प्रेग्नंट…”

Tags: entertainmentraqesh bapatRidhi DograRidhi Dogra On Raqesh Bapat After Divorceridhi dogra raqesh bapat divorce
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Bigg Boss Marathi Updates

"तुला शिव्या देण्याची सवय आहे", अनुश्री-प्राजक्तामध्ये पेटला वाद; प्रोमोमधील कॅट फाईट पाहून चाहते उत्सुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.