अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने मराठी मालिका व नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. गेली अनेक वर्ष ती या मनोरंजन सृष्टीत सक्रिय असून तिने साकारलेल्या अनेक पात्रांमधून आपल्या अभिनयाची वेगळीच छाप पाडलेली आहे. विनोदी असो किंवा खलनायिका, विशाखाच्या प्रत्येक भूमिकेचे रसिकांकडून भरभरून प्रेम मिळालेलं आहे. पण, यामागे अभिनेत्रीचा प्रचंड संघर्ष असून अनेक लोकांकडून मिळालेले टोमणे सहन करावे लागले आहे. असं असूनही ती आज उत्तम अभिनेत्रींमध्ये ओळखली जाते. (Vishakha Subhedar on Channel War)
अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने गेली अनेक वर्ष विनोदी स्किट्स केले असून ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा भाग राहिली आहे. दरम्यान, हास्यजत्रेत सर्व काही सुरळीत असताना विशाखाने अचानक हा कार्यक्रमाला सोडचिट्ठी दिली होती. त्यानंतर तिला स्टार प्रवाहवरील ‘शुभविवाह’ मालिकेत खलनायिकेची भूमिका मिळाली. पण अचानक हास्यजत्रा सोडण्यामागे काय कारण होते, आणि सध्याच्या चॅनेल वॉर वर तिचं काय मत आहे, याचा खुलासा नुकतेच तिने ‘इट्स मज्जा’शी संवाद साधताना केला आहे.
‘इट्स मज्जा’च्या “मज्जाच्या अड्डा” या कार्यक्रमात अभिनेत्री विशाखा सुभेदारने हजेरी लावली. यावेळी तिने अनेक गोष्टींचा खुलासा करताना तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्याबरोबर सध्याच्या चॅनेल वॉरबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. विशाखा म्हणाली, “पैसे जास्त मिळाले की तुम्ही काम सोडता, असे अनेक प्रेक्षक बोलतात. पण शेवटी त्यांचं प्रेम असल्याने त्यांना राग व्यक्त करण्याचा अधिकारदेखील आहे. कारण, आम्हाला जसं प्रेक्षकांचा प्रेम हवं, तसं त्यांचा रागसुद्धा आमच्यासाठी महत्वाचा आहे.”
हे देखील वाचा – रिंकू राजगुरूने अचानक डिलिट केल्या सगळ्या इन्स्टाग्राम पोस्ट, यामागचे कारण नेमकं काय ?
पुढे ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागचे कारण सांगताना म्हणाली, “खरंतर हे मी अनेकांना सांगितलं आहे. आणि अजूनही मी याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते. पण मला सांगावंसं वाटतं की, मला याचा कंटाळा आला होता. मी १३ वर्षे स्किट फॉरमॅट करत आले, त्यामुळे मला वेगळं काहीतरी करायचं होतं. स्किट झाल्यानंतर कोणीतरी मला त्याच्यावर कमेंट किंवा जजमेंट करावं, याचा फार कंटाळा आला होता. त्यामुळे मी जेवढं होतं, तेवढं केलं. याच्यावर मी जाऊ शकत नाही.”
हे देखील वाचा – “म्हातारं झालं आणि लाचार…”, गश्मीर महाजनीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, “मानगुटीवर बसून…”
“माझा एव्हरेस्ट मी चढली, आणि मी यात खूप खुश आहे. आता परत परत ते कशाला खोदु ? त्यामुळे मी हा कार्यक्रम सोडला असून मला स्वतःलाच मी कुठे आहे, हे तपासून बघायला मजा आली. जसं मला नाटक करताना आलं तसं. आजही लोक जेव्हा मला हास्यजत्रा सोडली असं विचारतात. तेव्हा मी म्हणते, धन्यवाद पण आता करू शकत नाही. त्यातच आता चॅनेल वॉर सुद्धा पाहायला मिळतात. त्यामुळे आता जर तुम्ही स्टार प्रवाहला गेले की, सोनी मराठीवाले तुम्हाला परत घेणार का ? असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण होतो.”, असं विशाखा म्हणाली.