बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विशाखा सुभेदारच्या लग्नासाठी आई वडिलांचा होता नकार, खुलासा करत म्हणाली, “एका अटीवर त्यांनी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 15, 2023 | 9:45 pm
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
Vishakha subhedar told story about her wedding

Vishakha subhedar told story about her wedding

महाराष्ट्रातील विनोदी कलाकारांच्या यादीत सर्वात अग्रणीय यादीत जिचं नाव घेतलं जात ती अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखाने आजवर विविध कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या बऱ्याच पसंतीस पडल्या. तिच्या विनोदाच्या शैलीमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा मिळवली. आज अभिनय क्षेत्रात तिची वेगळी अशी ओळख आहे. विशाखाचा या क्षेत्रातील प्रवास जितका खडतर होता तितकच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रवासातही चढ-उतार भोगावे लागले. (Vishakha Subhedar told story about her wedding)

सुरुवातीला त्यांच्या घरात तिच्या लग्नाला नकार होता. त्यांचे आई-वडील त्यांच्या लग्नासाठी तयार नव्हते. कारण त्यांना अभिनय क्षेत्रच मान्य नव्हतं. त्यामुळे या क्षेत्रातील तिच्यासाठी नवरा कसा मान्य असेल! याबद्दल बोलताना विशाखा सांगते, “आमच्या लग्नासाठी माझ्या आजीने पुढाकार घेतला. तिने आई-बाबांना सांगितलं की मुलीला या क्षेत्रात आवड आहे. आपल्या जातीतला मुलगा शोधायला गेला तर मराठा जातीत तिला या क्षेत्रात पुढे करिअर करु देणारा मुलगा भेटला नसता. सुदैवाने असा मुलगा मिळतो आहे जो तिला या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी देईल. तर तु का थांबवतो आहेस?”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Video : ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप, अवधूत गुप्तेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

पुढे विशाखा सांगते की, “अगोदर मुलींना या क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची तेवढी मुभा नव्हती. आजची परिस्थिती खूप वेगळी आहे आजच्या मुलींना ही संधी मिळते. त्यानंतर माझ्या आई-वडिलांनी विचार बदलला. आजी एवढं सांगत आहे तर आपण आई-वडील म्हणून तिच्या सुखाचा विचार करायला हवा. त्यानंतर आमच्या लग्नाला आई-वडिलांनी परवानगी दिली. पण माझ्या लग्नावर आजी-आजोबांनी एक अट सांगितली होती”.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – “गणपतीच्या मंडपात पत्त्यांचे डाव अन्…”, मिलिंद गवळींचं सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले, “मुलं दारू पिऊन…” 

पुढे त्या अटीबद्दल सांगताना ती म्हणाली, “जर आमची मुलगी भविष्यात टिव्हीवर दिसली पाहिजे तरच आम्ही या लग्नाला होकार देऊ. या एका अटीवर आमचं लग्न झालं. आता मात्र माझा नवरा मला सांगतो की, मी तुझ्या आजोबांची अट पूर्ण केली”, आज विशाखाच्या आजी-आजोबांची अट व स्वप्न पुर्ण झालं. विशाखा टिव्हीवर नुसत्या दिसतच नाहीत तर त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनंही जिंकतात.  

Tags: marathi actressvishakha subhedar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Vishakha subhedar told about her son name

महाविद्यालयात असतानाच विशाखा सुभेदारने ठरवली होती स्वतःच्या मुलांची नावं, म्हणाली, "वंशाचा दिवा पुढे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.