सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नात्याबाबत कळताच घरी कोंडून ठेवलं, विशीत लग्न अन्…; विशाखा सुभेदारने प्रियकराशीच केला विवाह, म्हणाली, “बालिश असतो पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 17, 2023 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vishakha Subhedar Lovestory

नात्याबाबत कळताच घरी कोंडून ठेवलं, विशीत लग्न अन्…; विशाखा सुभेदारने प्रियकराशीच केला विवाह, म्हणाली, “बालिश असतो पण…”

कलाकार मंडळींच्या खासगी आयुष्याबाबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना विशेष आवडत. त्यांचा खरा जोडीदार कोण, त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोण आहेत याबद्दल विशेष जाणून घेणं चाहत्यांना आवडत. कलाकारांच्या प्रेमकहाणी जाणून घ्यायला चाहत्यांना कायमच आवडत. अशातच लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदार हिच्या लव्हस्टोरीची कथा समोर आली आहे. इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री विशाखा सुभेदर हिने तिच्या प्रेमकहाणीबाबत भाष्य केलं आहे. (Vishakha Subhedar Lovestory)

विशाखाला तिच्या लव्हस्टोरीबाबत विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याला मी आधी दादा म्हणायचे. त्यामुळे आमची जेव्हा ओळख झाली तेव्हा तो महेश दादा होता. त्यामुळे खरं तर आमच्याबाबतीत दादाबाई नवरोजी झालं आहे. एका नाटकादरम्यान आमची भेट झाली. ‘काकस्पर्श’ असं त्या नाटकाचं नाव होतं. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तो या नाटकाचं काम पाहत होता. तेव्हा तोच मला बोलला की मला दादा म्हणू नको. त्यादरम्यान मी अगदी लहान होते. तो असं का म्हणतो? हे मला कळंतच नव्हतं.”

आणखी वाचा – Video : “मी वजनदार आहे पण…”, लावणी सादर करत विशाखा सुभेदारचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, म्हणाली, “भूकंप होईल या…”

यापुढे बोलताना विशाखा म्हणाली, “सतत काळजी घेणारा, प्रेम करणारा व्यक्ती स्त्रियांना हवा असतो. आताच्या मुली मानसिकरित्या सक्षम आहेत. पण आमची पिढी अगदी मुर्ख होती. आम्हाला काहीही कळायचं नाही. आम्ही फक्त प्रेमाच्या नादात होतो. त्यावेळी असा मी काही वेगळा विचार केला नाही. तो आवडला, त्याने मला विचारलं आणि मी लग्न करण्यास होकार दिला. आमचं लग्नही झालं. पण आमच्या लग्नाचा आई-वडिलांकडून खूप नकार होता. कारण माझ्या आई-वडिलांना मी नाटकामध्ये काम करणंही आवडत नव्हतं. तर माझ्या आजीने त्यांची समजूत काढली. तिच्या इंडस्ट्रीमध्ये तिला पाठिंबा देणारा मुलगा तिला आवडला आहे तर विचार करा. कारण त्याकाळी या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या मुलीला पाठिंबा मिळेल की नाही? याचा विश्वास नव्हता.”

View this post on Instagram

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

आणखी वाचा – “मला फटकारलं, टोमणे मारले अन्…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यावरुन विशाखा सुभेदारचं भाष्य, म्हणाली, “कोणी मला जज करावं हे…”

“आजीने समजवल्यानंतर बाबांनी लग्नाला परवानगी दिली. पण माझ्या आजी-आजोबांची एक अट होती की, आम्ही आमच्या मुलीचं लग्न करुन देत आहोत पण ती टीव्हीमध्ये दिसली पाहिजे. पण माझ्या नवऱ्यानेही आजी-आजोबांना दिलेला शब्द पूर्ण केला. मात्र घरी माझ्या नात्याबाबत कळताच आई पंधरा दिवस बोलत नव्हती. मग घरी मला कोंडूनही ठेवलं. चाळीशी गाठल्यानंतर कळतं की, तेव्हा आपण किती बालिश होतो. २० ते २१व्या वर्षामध्येच लग्न झालं”.

Tags: entertainmentits majja exclusivevishakha subhedarvishakha subhedar lovestory
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Akshay Mudawadkar New Drama

अभिनेता अक्षय मुडावदकर व अभिनेत्री अक्षया नाईक गाजवणार रंगमंच, 'या' नाटकानिमित्त पहिल्यांदाच एकत्र

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.