शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिनेता अक्षय मुडावदकर व अभिनेत्री अक्षया नाईक गाजवणार रंगमंच, ‘या’ नाटकानिमित्त पहिल्यांदाच एकत्र

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 17, 2023 | 2:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshay Mudawadkar New Drama

अभिनेता अक्षय मुडावदकर व अभिनेत्री अक्षया नाईक गाजवणार रंगमंच, 'या' नाटकानिमित्त पहिल्यांदाच एकत्र

ज्येष्ठ अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांचं गाजलेलं ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येण्यास सज्ज होत आहे. या नाटकादरम्यान छोटा पडदा गाजवणारे दोन कलाकार पहिल्यांदाच एकत्र रंगमंचावर पाहायला मिळणार आहेत. अभिनेता अक्षय मुडावदकर व अभिनेत्री अक्षया नाईक ही नवी जोड़ी या नाटकच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आली आहे. बऱ्याच दिवसांपासून एका नाटकाच्या प्रोमोने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं होत. आता या नाटकात कोणते कलाकार झळकणार आणि नाटकाचे नाव समोर आले आहे. अभिनेत्री अक्षया नाईकचा या नाटकातील लुक काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून प्रदर्शित करण्यात आला होता. (Akshay Mudawadkar New Drama)

अक्षयाच्या या लुकला रसिकांचा उत्तम प्रतिसाद ही मिळाला. आता या नाटकातील अभिनेता अक्षय मुडावदकरचा लुक प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. तसेच नाटकाचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते नाटकाचे नाव जाहिर केल्यामुळे या नाटकाची उत्सुकता कमालीची वाढली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात हे नाटक रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा – ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईकची रंगभूमीवर दमदार एन्ट्री, नव्या लूकने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

नाटकाची निर्मिती भूमिका ‘थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट’ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. केतकी प्रवीण कमळे यांनी निर्मिती केलेल्या ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ नाटकाचं दिग्दर्शन महेश डोकंफोडे यांनी केलं आहे. संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य, अशोक पत्की यांनी संगीत, शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजना, अक्षय मुडावदकर आणि अभिषेक करंगुटकर यांनी गीतलेखन,नेहा मुडावदकर यांनी वेशभूषा, संदीप नगरकर यांनी रंगभूषेची जबाबदारी निभावली आहे. तर अक्षय मुडावदकर, अक्षया नाईक यांच्यासह महेश डोकंफोडे, अमृता तोडरमल यांच्याही नाटकात भूमिका आहेत.

आणखी वाचा – “चाकरमानी निघाले…”, निखिल बनेचा गणेशोत्सवासाठी कोकणाच्या दिशेने प्रवास, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आम्ही जाताव…”

पंचवीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला होता. अतिशय हलकंफुलकं मनोरंजक असलेल्या नाटकाचं खूप कौतुक झालं. जुनं ते सोनं या म्हणीनुसार प्रेक्षकांना पुन्हा एकदा तोच मनोरंजक अनुभव नव्या रुपात देण्यासाठी या नाटकाची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. कसदार लेखनाला उत्तम अभिनयाची साथ असल्यानं हे नाटक रसिकांचं नक्कीच पुरेपुर मनोरंजन करेल यात शंका नाही.

Tags: akshay mudawadkarakshaya naikchukbhul dyavi ghyavientertainmentnew drama
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Sankarshan Karhade Viral Video

संकर्षण कऱ्हाडेने अमेरिकेतल्या चाहत्यांची मागणी केली पूर्ण, सादर केली खास कविता, म्हणाला, "भ्रष्टाचार पुन्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.