शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : हार्दिक पांड्याला ट्रोल करणाऱ्यांना विराट कोहलीची समज, सामना सुरु असताना केलेल्या ‘त्या’ कृतीचं कौतुक, व्हिडीओ व्हायरल

सौरभ जाधवby सौरभ जाधव
एप्रिल 12, 2024 | 1:27 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Virat Kohli Hardik Pandya Video

Virat Kohli Hardik Pandya Video

सध्या सर्वत्र आयपीयलचा थरार सुरू आहे. एकापेक्षा एक अनेक रोमांचकारी सामन्यांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. असाच एक रोमांचकारी सामना रंगला मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये. नाणेफेक जिंकून मुंबईने बंगळुरूला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या आक्रमी गोलंदाजी समोर बंगळुरूच्या फलंदाजांना जास्त वेळ तग धरता आला नाही. जसप्रीत बुमराहच्या आक्रमक माऱ्याने बंगळुरूचे पाच गाडी बाद करत मुंबईचा विजय सुनिश्चित केला.(Virat Kohli Hardik Pandya Video)

या सामन्यामध्ये विराट कोहली खास कामगिरी करू शकला नाही पण त्याच्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकली. हार्दिक पांड्याने यंदा कर्णधार पदाची धुरा सांभाळली आणि मुंबईच्या चाहत्यांचा राग चांगलाच अनावर झालेला पाहायला मिळाला. रोहित शर्मा सारख्या अनुभवी कर्णधाराला अचानक कर्णधार पद सोडायला लावल्याचा आरोप चाहत्यांनी हार्दिक आणि मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनावर केला. यंदाच्या हंगामात मुंबईला पहिल्या तीन सामन्यात दारुण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे हे सामने मुंबईला गमवावे लागले असे अनेक क्रिकेट तज्ञांचे व चाहत्यांचे म्हणणे आहे. त्याचे परिणाम या सामन्यातही दिसून आले हार्दिक फलंदाजीसाठी येताच प्रेक्षकांनी त्याला चिडवायला सुरुवात केली. चाहत्यांचा अतिरेक पाहून विराट कोहली ने ” कृपया असं काही करू नका, लहान मुलं आहात का?” असा इशारा प्रेक्षकांना केला आणि वातावरण क्षणात बदललं. हार्दिकला चिडवणारे अचानक त्याला पाठिंबा देऊ लागले. तसेच मुंबईने सामना जिंकल्यानंतर हार्दिक व विराट यांची गळाभेट देखील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by sk11_efx (@cric7tamil)

आणखी वाचा- सयाजी शिंदे यांच्या हृदयावर साताऱ्यामध्ये शस्त्रक्रिया, डॉक्टरांकडून मोठी माहिती, म्हणाले, “हृदयविकाराचा झटका येण्याआधीच…”

सूर्यकुमार यादवचा हल्लाबोल
सूर्यकुमारने मागच्या सामन्यात पुन्हा एकदा मुंबईच्या संघात आपले स्थान मिळवले. पण पहिल्या सामन्यात सूर्यकुमारला हवी तशी कामगिरी करण्यात यश आले नाही. मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यात मुबंईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने या सामन्यात तुफानी फलंदाजी करत केवळ १७ चेंडूमध्ये ५२ धावांची खेळी करत मुंबईच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.(Virat Kohli Hardik Pandya Video)

आणखी वाचा- नवऱ्याच्या पाया पडण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि…”

बुमराह-ईशान ठरले मुंबईच्या यशाचे शिल्पकार
प्रथम गोलंदाजी करत बंगळुरूच्या संघाला १९६ धावांमध्ये अर्ध्या संघाला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवण्यात जसप्रीत बुमराहने मोलाचे योगदान दिले. विराट कोहलीसह अन्य चार फलंदाजांना जसप्रीत बुमराहने बाद करत बाहेरचा रास्ता दाखवला. तर १९६ धावांचा पाठलाग करत असताना ईशान किशनने कमी चेंडूमध्ये तब्बल ७० धावांची खेळी उभारली आणि मुंबईचा वैजय सुनिश्चित केला.

Tags: mumbai indiansrohit sharmavirat kohli
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
South Korean singer Park Bo Ram died

अवघ्या ३०व्या वर्षी लोकप्रिय गायिकेचा मृत्यू, बाथरुममध्ये पडल्यानंतर पुन्हा उठलीच नाही अन्…; पोलिसांकडून तपास सुरु

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.