T-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वविजेतेपदावर आपलं नाव कोरलं. विराट कोहलीने अंतिम सामन्यात शानदार खेळी करत भारताला विजयाच्या समीप नेले. या विजयाबद्दल खेळाडू, प्रशिक्षकांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. विश्वचषक जिंकताच विराटची पत्नी अनुष्का शर्माने आपल्या पतीचे कौतुक करणारी एक खास पोस्ट केली होती. अशातच विराट कोहलीनेही पत्नी अनुष्का शर्मासाठी खास पोस्ट लिहीत प्रेम व्यक्त केलं आहे. विराटने त्याच्या इन्टाग्रामवर अनु्ष्काबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर करत त्याखाली ‘तुझ्याशिवाय हे काहीच शक्य झालं नसतं. हा जेवढा माझा विजय आहे, तेवढाच तुझाही आहे’ असं म्हणत तिचे आभार मानल आहेत.
अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती आपल्या पतीला कायमच पाठींबा देत असते. विराटचा विजय असो, चांगली खेळी असो किंवा अगदी विराटला कधी एखाद्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असो. अनुष्का नेहमीच त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली दिसते. त्याचपद्धतीने विराटही आपल्या पत्नीसाठी कायमच काहीना काही पोस्ट शेअर करत असतो. अशातच आता त्याने अनुष्कासाठी पुन्हा एकदा एक खास पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – “हिंदूत्वाशी गद्दारी…”, ‘धर्मवीर-२’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, पोस्टर लॉंचला कलाकारांची हजेरी
विराटनेही अनुष्कासाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीली आहे. त्याने दोघांचाही एक हसरा फोटो शेअर करत, त्यामध्ये अनुष्काचं कौतुंक करत असं म्हटलं आहे की, “हा विजय तुझ्याशिवाय अशक्य होता. तुझ्यामुळे मी नेहमीच नम्र असतो आणि तुझ्यामुळेच माझे पाय जमिनीवर राहतात. त्यामुळे माझ्या यशात तुझा मोठा वाटा आहे. हा विजय, हे यश जेवढं माझं आहे तेवढंच ते तुझं आहे. धन्यवाद. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो”.
आणखी वाचा – सिंह, मेष व कर्क राशीसाठी सोमवारचा दिवस असणार फारच खास, नोकरी-धंद्यात मिळणार चांगलं यश,जाणून घ्या…
दरम्यान, अल्पावधीतच विराटची ही पोस्ट सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाली असून त्यावर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या पोस्टला ८० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून अनेकांनी कमेंट्स विराट-अनुष्काच्या जोडीचं कौतुक केलं आहे. अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर विराटने T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली.