बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हिंदूत्वाशी गद्दारी…”, ‘धर्मवीर-२’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, पोस्टर लॉंचला कलाकारांची हजेरी

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 2, 2024 | 12:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dharmaveer 2 poster launch and movie will be release on 9 August know more

"हिंदूत्वाशी गद्दारी...”, 'धर्मवीर-२' 'या' दिवशी होणार प्रदर्शित, पोस्टर लॉंचला कलाकारांची हजेरी

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर दोन वर्षांपूर्वी ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर-२’ची घोषणा करण्यात आली होती आणि नुकतंच या चित्रपटाचे दुसरं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर हा सोहळा पार पडला. यावेळी अशोक सराफ, महेश कोठारे आणि बॉबी देओलदेखील उपस्थित होते.

‘धर्मवीर-२’ च्या पोस्टर प्रकाशन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेते अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलही उपस्थित होता. ‘धर्मवीर-२ चित्रपटाच्या या कार्यक्रमात निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई यांनी चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत सांगितलं. ‘धर्मवीर’ चित्रपटाचा पहिला भाग शिवसेना दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या संपूर्ण आयुष्यावर आधारित होता. त्यामुळे ‘धर्मवीर-२’मध्ये काय नवीन असणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

आणखी वाचा – त्रिनयना देवीने नेत्राला दिली नवीन शक्ती, विरोचकाला नवीन शक्तीबद्दल कळणार का?

‘धर्मवीर -२ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटांत साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट दाखण्यात येणार असल्याचे पोस्टरवरुन दिसत आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी हा संपू्र्ण महाराष्ट्रात मराठी व हिंदी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बॉबी देओल यांच्या हस्ते पोस्टर प्रकाशन सोहळा पार पडला. अभिनेते प्रसाद ओकनेही त्याच्या सोशल मीडियाद्वारे पोस्टर शेअर केलं असून ‘हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे.

आणखी वाचा – सिंह, मेष व कर्क राशीसाठी सोमवारचा दिवस असणार फारच खास, नोकरी-धंद्यात मिळणार चांगलं यश,जाणून घ्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटाला शुभेच्छा देताना ‘धर्मवीर-२’ चित्रपटाचे आणि मंगेश देसाई यांचं खूप खूप अभिनंदन करतो. जेव्हा त्यांनी ‘धर्मवीर’ हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांनी मला या चित्रपटासाठी सहकार्य हवं असं म्हटलं. त्यांच्या चित्रपटासाठी मदत करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती” असं म्हटलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसाद ओकच्या अभिनयाचंही कौतुक केलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी  महाराष्ट्राच्या विकासाचीदेखील माहिती दिली, ज्याचंही कलाकारांनी कौतुक केलं.

Tags: dharmaveer 2marathi entertainment newsmarathi movie
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Bigg Boss Ott 3

'बिग बॉस ओटीटी'मधून पहिली पत्नी बाहेर पडताना हसताना दिसला अरमान मलिक, म्हणाला, "ती गेली तरी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.