बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझ्याशिवाय हा विजय…”, विराट कोहलीची पत्नीसाठी कौतुकास्पद पोस्ट, म्हणाला, “हे यश…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 1, 2024 | 11:19 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Virat Kohli shared a special post for his wife Anushka Sharma and said that this victory was not possible without you.

“तुझ्याशिवाय हा विजय...”, विराट कोहलीची पत्नीसाठी कौतुकास्पद पोस्ट, म्हणाला, “हे यश…”

T-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वविजेतेपदावर आपलं नाव कोरलं. विराट कोहलीने अंतिम सामन्यात शानदार खेळी करत भारताला विजयाच्या समीप नेले. या विजयाबद्दल खेळाडू, प्रशिक्षकांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. विश्वचषक जिंकताच विराटची पत्नी अनुष्का शर्माने आपल्या पतीचे कौतुक करणारी एक खास पोस्ट केली होती. अशातच विराट कोहलीनेही पत्नी अनुष्का शर्मासाठी खास पोस्ट लिहीत प्रेम व्यक्त केलं आहे. विराटने त्याच्या इन्टाग्रामवर अनु्ष्काबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर करत त्याखाली ‘तुझ्याशिवाय हे काहीच शक्य झालं नसतं. हा जेवढा माझा विजय आहे, तेवढाच तुझाही आहे’ असं म्हणत तिचे आभार मानल आहेत.

अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती आपल्या पतीला कायमच पाठींबा देत असते. विराटचा विजय असो, चांगली खेळी असो किंवा अगदी विराटला कधी एखाद्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असो. अनुष्का नेहमीच त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली दिसते. त्याचपद्धतीने विराटही आपल्या पत्नीसाठी कायमच काहीना काही पोस्ट शेअर करत असतो. अशातच आता त्याने अनुष्कासाठी पुन्हा एकदा एक खास पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

आणखी वाचा – “हिंदूत्वाशी गद्दारी…”, ‘धर्मवीर-२’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, पोस्टर लॉंचला कलाकारांची हजेरी

विराटनेही अनुष्कासाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीली आहे. त्याने दोघांचाही एक हसरा फोटो शेअर करत, त्यामध्ये अनुष्काचं कौतुंक करत असं म्हटलं आहे की, “हा विजय तुझ्याशिवाय अशक्य होता. तुझ्यामुळे मी नेहमीच नम्र असतो आणि तुझ्यामुळेच माझे पाय जमिनीवर राहतात. त्यामुळे माझ्या यशात तुझा मोठा वाटा आहे. हा विजय, हे यश जेवढं माझं आहे तेवढंच ते तुझं आहे. धन्यवाद. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो”.

आणखी वाचा – सिंह, मेष व कर्क राशीसाठी सोमवारचा दिवस असणार फारच खास, नोकरी-धंद्यात मिळणार चांगलं यश,जाणून घ्या…

दरम्यान, अल्पावधीतच विराटची ही पोस्ट सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाली असून त्यावर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या पोस्टला ८० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून अनेकांनी कमेंट्स विराट-अनुष्काच्या जोडीचं कौतुक केलं आहे. अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर विराटने T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली.

Tags: anushka sharmaentertainment newsvirat kohli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

बदललेल्या फाईलमागचं सत्य आलं समोर, प्रियाचा डाव तिच्यावरच उलटला, सायली-अर्जुनमध्ये वाढतेय जवळीक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.