मराठी सिनेसृष्टीत रिलस कुटुंबाप्रमाणेच रिअल कुटुंब देखील प्रेक्षकांचं मन जिंकतात. या रिअल लाईफ कुटुंबाची तर सोशल मीडियावर नेहमी चर्चा रंगते. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. तर अश्यातच कायम मनोरंजन विश्वात चर्चेत असणार कुटुंब म्हणजे कुलकर्णी कुटुंब. मृणाल कुलकर्णी,विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे कुलकर्णी हे नेहमी सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात.तसेच ते अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबासोबतचे काही क्षण तसेच ते एकमेकांना प्रोत्साहित करणाऱ्या पोस्ट देखील शेअर करतात.(Virajas Kulkarni)
वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी लेकाला दिला ‘हा’ खास सल्ला
आज विराजसचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्याची आई अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि पत्नी शिवानी रांगोळे यांनी त्याच्यासाठी खास पोस्ट केली. त्यांच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलयं. विराजसचा एक फोटो अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी शेअर करत त्यांनी लिहिलं, “प्रिय विराजस, आमचा शहाणा मुलगा तर तू आहेसच,पण आता लग्नानंतर “बॅलन्सिंग ऍक्ट” पण तू मस्त पार पाडतो आहेस. यावर्षी तुझा पहिला सिनेमा रिलीज झाला, त्याला यश मिळाले , सर्व थरातील लोकांनी त्याची नोंद घेतली, याचा खूप अभिमान वाटतो. तू येणाऱ्या वर्षी जे जे प्लॅन केलं आहेस ते सर्व उत्तम रीतीने पार पडो आणि त्यात तुला भरघोस यश मिळो. शिवानी आणि तुला खूप प्रेम …Happy Birthday!!! PS : आता तरी थोडासा केक खायला लाग ! आई – बाबा.” तर यातून आईच लेकावर असलेलंन प्रेम आणि आईची माया पाहायला मिळते तर ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

====
हे देखील वाचा –‘माझा मित्र लक्ष्मीकांत….’ पोस्ट शेअर करत या बॉलिवूड अभिनेत्याने काढली लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण
====
यासोबतच बायकोने म्हणजे शिवानीने देखील एक भन्नाट व्हिडीओ शेअर करत विराजसला खास अंदाजात शुभेच्छा दिल्यात. तिने शेअर केलेल्या व्हिडिओत दोघेही खास उखाणा घेताना दिसून येतात. हा व्हिडीओ शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा विराजस, इथे एकमेकांची वाक्ये आणि जेवणाच्या थाळ्या पूर्ण करायच्या आहेत! अनाथेमा ते व्हिक्टोरिया पर्यंतचे तुमचे पहिले नाटक, दिग्दर्शनात पदार्पण असा तुमच्या प्रवासाचा एक भाग बनल्याबद्दल खूप आनंद झाला! हे तुमचे वर्ष आहे! छान राहा असं म्हणत तिने विराजसचं कौतुक केलंन. तर हिच्या पोस्टवर चाहत्यांनी देखील विराजसवर शुभेच्छांचा वर्षाव केला.(Virajas Kulkarni)
तसेच विराजस कुलकर्णी ,मृणाल कुलकर्णी आणि शिवानी कुलकर्णी हे तिघेही उत्तम कलाकार आहे. तसेच शिवानी हि देखील लवकत्च झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे तर विराजसने व्हीकटोरिया या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाउल टाकलं.