गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडिलांचं निधन झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेता घरातच कुटुंबियांसह करत होता पार्टी, अमिताभ बच्चन सांत्वन करायला गेले अन्…; स्वतःच केला खुलासा

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 9, 2024 | 12:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vindu dara singh on dara singh death

वडिलांचं निधन झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेता घरातच कुटुंबियांसह करत होता पार्टी, अमिताभ बच्चन सांत्वन करायला गेले अन्...; स्वतःच केला खुलासा

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेमध्ये हनुमानाची भूमिका साकरणाऱ्या दारा सिंग यांचे 2012 मध्ये वयाच्या 83व्या निधन झाले. ते एक कुस्तीपटूही होते.  त्यांनी हिंदी मालिका तसेच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘जब वी मेट’ या चित्रपटातील ‘दादाजीं’ची भूमिका सर्वांच्याच लक्षात आहे. त्यांना तीन मुली व दोन मुलं आहेत. त्यांचा मुलगा विंदू दारा सिंह हादेखील हिंदी चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. त्यानेही अनेक हिंदी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकरल्या आहेत. (Vindu dara singh on dara singh death)

नुकताच विंदूने दारा सिंह यांच्या मृत्यूच्या वेळेचा एक किस्सा सांगितला आहे. त्याने सांगितले की, “वडिलांच्या मृत्यूनंतर आम्ही शॅम्पेन पिऊन आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा खुद्द अमिताभ बच्चन यांनी तिथे येऊन ही चित्र पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला”.

आणखी वाचा – “सर तुम्ही आहात म्हणून…”, सचिन गोस्वामींच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुलेंची भावुक पोस्ट म्हणाले, “अफाट, अचाट आणि अद्वितीय..”

View this post on Instagram

A post shared by Mukesh Rishi (@officialmukeshrishi)

पुढे तो म्हणाला की, “माझ्या वडिलांनी सांगितले होते की, जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या आयुष्याचा आनंद साजरा करा. रडू नका’. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सर्व कुटुंब एकत्र जमा झाले होते. रात्री कुटुंबातील सर्वजण म्हणजे भाऊ,बहीण,भवोजी सर्वच होते. आम्ही विचार केला की बाबांसाठी रडण्यापेक्षा आपण त्यांनी जगलेल्या आयुष्याचा आनंद साजरा करावा. त्यामुळे आम्ही शॅम्पेन पिण्यास सुरवात केली. पार्टी करण्यास सुरवात केली आणि ‘टू डॅड, टू डॅड’ बोलण्यास सुरवात केली.

आणखी वाचा – “डुकरासारखा खातो आणि कुत्र्यासारखा व्यायाम…”, सलमान खानबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “जेवढे खातो ते…”

पुढे त्याने सांगितले की, “आम्ही पार्टी करत असतानाच दरवाज्याची बेल वाजली.दरवाजा उघडून पाहिले तर समोर अमिताभजी उभे होते. ते सांत्वन करण्यासाठी आले होते. पण त्यांनी पार्टी बघून विचारले की हे नक्की काय चाललं आहे? मी उत्तर दिले की, माझ्या वडिलांनी आनंद साजरा करायला सांगितला होता. त्यानंतर त्यांनी माझ्या आईबद्दल विचारले मी सांगितले की ती तिथे बसली आहे. ते माझ्या आईजवळ जाऊन बोलू लागले. पण त्यांना अजूनही घडल्या प्रकाराबद्दल आश्चर्य वाटत होते”.

विंदूने दारा सिंह यांच्या अनेक अनेक आठवणी ताज्या केल्या आहेत.

Tags: amitabh bachchancelebrationdara singhdara singh deathdara singh death dayVindu dara singh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Adil Khan Durrani wedding

दुसऱ्या लग्नानंतर राखी सावंतच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याने बायकोसह शेअर केला व्हिडीओ, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, "खेळ मांडला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.