‘मिर्झापूर’ या वेबसीरिज मधून प्रसिद्धीस व लोकप्रियतेस आलेला अभिनेता म्हणजे विक्रांत मॅसी. बॉलिवूड अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेला विक्रांत मॅसी हा शीतल ठाकूरसह विवाहबंधनात अडकला. विक्रांत व शीतलने नुकतीच चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. दोघांनी त्यांच्या पहिल्या पालकत्वाची गोड बातमी दिली. या जोडप्याने फेब्रुवारी २०२२ मध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न केले. त्यानंतर आता एका वर्षाच्या वैवाहिक आनंदानंतर, शीतल गरोदर असल्याचा दावा एका अहवालादरम्यान करण्यात आला आहे. असे असले तरी या जोडप्याने अद्याप त्याच्या पालकत्वाबाबत अधिकृत अशी घोषणा केलेली नाही. (Mirzapur Fame Actor Shares Goodnews)
काही काळ या जोडप्याने एकमेकांना डेट केल्यानंतर, शीतल ठाकूर व विक्रांत मॅसी यांनी २०२२ मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले होते. आता, इटाइम्सने दिलेल्या अहवालानुसार, विक्रांत व शीतल हे बाळाचे पालकत्व स्वीकारण्यास तयार असल्याचं समोर आलं.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीची आत्महत्या, राहत्या घरी गळफास घेत संपवलं जीवन
‘ब्रोकन बट ब्युटीफुल’ फेम अभिनेत्याने इटाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपं त्यांच्या पहिल्या पालकत्वासाठी उत्सुक असल्याचं समोर आलं आहे. लग्नानंतरच्या त्यांच्या आयुष्याच्या या नवीन टप्प्यात प्रवेश करण्यासाठी ते खूप उत्साहित आहेत. मात्र, विक्रांत व शीतल या दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ या वेब शोच्या सेटवर विक्रांत व शीतल हे दोघे एकमेकांना भेटले आणि प्रेमात पडले. नोव्हेंबर २०१९ मध्ये एका खाजगी रोका सेरेमनीमध्ये त्यांचा विवाह झाला. या सोहळ्यादरम्यान त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. दरम्यान, विक्रांत मॅसीकडे अनेक बिग बजेट चित्रपट आहेत. हा अभिनेता शेवटचा विजय सेतुपतीसोबत ‘मुंबईकर’मध्ये दिसला होता. शिवाय विधू विनोद चोप्राच्या ‘१२वी फेल’, आदित्य निंबाळकरच्या ‘सेक्टर ३६’, ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ आणि इतर अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहे.