गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ‘छावा’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना या दोघांच्या ‘छावा’मध्ये प्रमुख भूमिका आहेत. नुकतंच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात प्रेक्षकांना छत्रपती संभाजी महाराजाच्या जीवनातील विविध टप्पे पाहायला मिळतात. राज्याभिषेक सोहळ्यापासून ते औरंगजेबाच्या कैदेत महाराजांनी कसा लढा दिला याचे विविध प्रसंग गाण्यात दाखवण्यात आले आहेत. या गाण्याचा लॉन्च सोहळा नुकताच पार पडला आणि या गाण्याचा लॉन्च सोहळ्याला रश्मिका व विकी कौशल यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी विकीने केलेल्या कृतीमुळे तो सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. (Vicky Kaushal helped Rashmika Mandana)
‘जाने तू’ चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या लॉन्च सोहळ्याला रश्मिका तिच्या पायाच्या दुखापतीमुळे व्हीलचेअरवर बसून आली होती आणि यावेळी विकी रश्मिकाला मदत करताना दिसला. त्याच्या या सुंदर कृतीने अनेक लोकांची मनं जिंकली आहेत आणि चाहते त्याचे कौतुक करत आहेत इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विकी रश्मिकाची व्हीलचेअर ओढताना होती. यावेळी तिला असहाय्य झालेले पाहून विकीने रश्मिकाची मदत केली. अभिनेत्याला मदत करताना पाहून नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा – Video : अंकुश चौधरीकडून वाढदिवसाचं अनोखं सेलिब्रेशन, गरजूंना अभिनेत्याकडून अन्नदान, व्हिडीओ व्हायरल
अनेक नेटकऱ्यांनी विकी-रश्मिकाच्या या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “विकी अगदी नम्र माणूस आहे”, “छावा त्याच्या येसूबाईसह”, “दयाळू विकी”, “यावरून विकीचे चांगले संस्कार आणि रश्मिकाचे तिच्या कामाबद्दलचे समर्पण दिसून येते” , “विकीने खरंच सुंदर काम केलं आहे”, “विकी रश्मिका Nailed it” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी विकी-रश्मिकाच्या व्हिडिओवर केल्या आहेत.
आणखी वाचा – दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला रॅपर रफ्तार, साऊथ इंडियन पद्धतीने केला विवाह, फोटो व व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार सुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. तर, ‘छावा’मध्ये औरंगजेबच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसेल.