काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटायने चाहत्यांना सुखद धक्का दिला. एमीवेने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत लग्न केल्याचं जाहीर केलं. गायिका स्वालिनाबरोबर एमीवे बंटाया लग्नबंधनात अडकला. त्यानंतर आता प्रसिद्ध रॅपर रफ्तारनेही लग्नगाठ बांधली आहे. काही वेळापूर्वी त्याचे काही फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यामधून रफ्तार पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं समोर आलं होतं आणि अखेर रॅपर लग्नबंधनात अडकला आहे. नुकतंच त्याच्या लग्नाची पत्रिका, हळदीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण रफ्तारने लग्नाबाबत अधिकृतरित्या घोषणा केली नव्हती. पण आता रफ्तारच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. (rapper raftaar marriage)
रफ्तारनं गर्लफ्रेंड मनराज जवांदाबरोबर त्याच्या नवीन वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली आहे. मात्र दोघांनीही लग्नाची कोणाला काहीच पत्ता लागू न देता गुपचूप लग्न उरकले. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रफ्तारने आपल्या खासगी आयुष्याची सुरुवात अगदी जोमात पद्धतीने केलेली आहे. रफ्तारच्या लग्नातील फोटो त्याच्या फॅन पेजकडून सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. या व्हायरल फोटो व व्हिडीओवर रफ्तार आणि मनराजवर चाहत्यांडून शुभेच्छा आणि आशिर्वादांचा वर्षाव होत आहे.
Congratulations Raftaar bhai😍 pic.twitter.com/q4tBBTRAP3
— Govind (@saygovind) January 31, 2025
आणखी वाचा – रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात, हळदी समारंभात होणाऱ्या पत्नीसह थिरकताना दिसला, व्हिडीओ समोर
रफ्तार घटस्फोटाच्या पाच वर्षांनंतर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. डिसेंबर २०१६मध्ये रफ्तारने कोमल वोहराशी पहिलं लग्न केलं होतं. या लग्नाच्या आधी दोघं पाच वर्ष एकमेकांना डेट करत होते. पण लग्नाच्या काही वर्षांनी २०२०मध्ये रफ्तारने कोमलबरोबर घटफोस्ट घेण्याचं निश्चित केलं. रफ्तार आणि कोमलने २०२२मध्ये घटस्फोट घेतला. ६ ऑक्टोबर २०२२ मध्ये ही जोडी कायदेशीररित्या विभक्त झाली.
दरम्यान, फॅशन स्टायलिस्ट मनराज जवंदाबरोबर रफ्तारने लग्नगाठ बांधली आहे. रफ्तारच्या लग्नाची बातमी वाचून चाहते आनंदी आणि उत्साही झाले आहेत. मनराज ही एक फॅशन स्टायलिस्ट आणि अभिनेत्रीही आहे. रफ्तारबरोबर तिने बऱ्याच म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं आहे. तसंच ती काही रिअॅलिटी शोमध्येदेखील झळकली होती. याशिवाय रफ्तारच्या पत्नीने बऱ्याच जाहिरातीमध्ये काम केलं आहे.