Vijay Kadam Died : मराठी चित्रपट, मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून मुख्य नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका अगदी लीलया पार पडणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे विजय कदम. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी १९८०च्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे विजय कदम काही काळ मनोरंजन सृष्टीपासून लांब होते आणि याचं कारण म्हणजे त्यांचं आजारपण.
विजय कदम यांनी नुकतीच कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली असून त्यांची ही झुंज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मात्र यावर विजय कदम यांना त्यांच्या कुटुंबियांची मोलाची साथ मिळाली. याबद्दल विजय कदम यांनी नुकताच ‘इट्स मज्जा’शी संवाद साधला. ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या आजारपणाबद्दल व या आजारपणातल्या त्यांच्या संघर्षाबद्दल सांगितले.
यावेळी विजय कदम यांनी असं म्हटलं की, “याचे सगळे श्रेय माझी पत्नी व माझा मुलगा गंधार यांची साथ मिळाली. हे दोघे माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले. तसंच हे एक वाईट स्वप्न समजून मी यातून लवकर बाहेर पडलो. शक्यतो यातून लवकर बाहेर पडत नाहीत. पण मी पडलो आणि नशिबाने चांगले डॉक्टर मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व माझ्या पत्नीच्या साथीमुळे मी यावर यशस्वी मात करु शकलो असं मला वाटतं”
यापुढे विजय कदम यांची पत्नी असं म्हणाली की, “या सगळ्या पहिली मदत झाली ती ईश्वराची. विजय कदम यांना झालेल्या आजारपणात आम्हीच जर मानसिकदृष्ट्या खचलो असतो तर तेही खचले असते. त्यामुळे मी व गंधार (मुलगा) त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिलो. विजय हे सर्वांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्याच्याविषयी मी इंडस्ट्रीत कुणाला फारसे काही सांगितले नाही. कारण जर त्याच्या आजारपणाची बातमी कळली असती तर सर्वांचे फोन कॉल्स घेण्यातच माझा दिवस गेला असता. त्यामुळे मी कुणालाच काही सांगितलं नाही.”
विजय कदम यांच्या चार केमिओथेरपी व दोन सर्जरी झाल्यानंतर मी फक्त विजय पाटकर व जयवंत वाडकर यांना विजयविषयी सांगितलं. कायारण हे तिघे त्रिकुट आहेत. त्यामुळे त्यांना विजयच्या आजाराविषयी माहिती असलं पाहिजे म्हणून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला सांगितलं. त्यानंतर मग मला मुख्यमंत्र्यांची मदत हवी होती. त्यामुळे सुशांत शेलार व मंगेश देसाई यांच्या मदतीने माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आणि मग त्यांचीही मला मदत मिळाली.”
आणखी वाचा – बहिणीचा जीव वाचवण्यासाठी लीलाने एजेंशी केलं लग्न, घरात आल्यानंतर सूना कशा वागवणार? मोठा ट्विस्ट
दरम्यान, जेष्ठ अभिनेते विजय कदम हे त्यांच्या विनोदी पात्रांमुळे अधिक लक्षात आहेत. त्यांची अनेक नाटकं रंगभूमीवर गाजली. विशेषतः त्याचं ‘विच्छा माझी पुरी करा’ व ‘टूर टूर’ ही नाटकं प्रचंड गाजली. त्यांनी चित्रपट क्षेत्रावरही स्वत:ची पकड मजबूत ठेवली. ‘चष्मेबहाद्दर’, ‘पोलीसलाईन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’व ‘आम्ही दोघ राजा राणी’ हे चित्रपट खूप नावाजले.