शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Vijay Kadam Death : कॅन्सरशी झुंज, दोन सर्जरी, अन्…; गंभीर आजारपणामुळे अशी झाली होती विजय कदम यांची अवस्था, म्हणाले, “माझ्या नशिबाने…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 10, 2024 | 11:44 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Veteran marathi actor Vijay Kadam talked about his cancer and his struggle with the disease.

कॅन्सरशी झुंज, दोन सर्जरी, अन्...; गंभीर आजारपणामुळे अशी झाली होती विजय कदम यांची अवस्था, म्हणाले, "माझ्या नशिबाने...”

Vijay Kadam Died : मराठी चित्रपट, मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून मुख्य नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका अगदी लीलया पार पडणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे विजय कदम. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी १९८०च्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे विजय कदम काही काळ मनोरंजन सृष्टीपासून लांब होते आणि याचं कारण म्हणजे त्यांचं आजारपण.

विजय कदम यांनी नुकतीच कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली असून त्यांची ही झुंज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मात्र यावर विजय कदम यांना त्यांच्या कुटुंबियांची मोलाची साथ मिळाली. याबद्दल विजय कदम यांनी नुकताच ‘इट्स मज्जा’शी संवाद साधला. ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या आजारपणाबद्दल व या आजारपणातल्या त्यांच्या संघर्षाबद्दल सांगितले.

यावेळी विजय कदम यांनी असं म्हटलं की, “याचे सगळे श्रेय माझी पत्नी व  माझा मुलगा गंधार यांची साथ मिळाली. हे दोघे माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले. तसंच हे एक वाईट स्वप्न समजून मी यातून लवकर बाहेर पडलो. शक्यतो यातून लवकर बाहेर पडत नाहीत. पण मी पडलो आणि नशिबाने चांगले डॉक्टर मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व माझ्या पत्नीच्या साथीमुळे मी यावर यशस्वी मात करु शकलो असं मला वाटतं”

यापुढे विजय कदम यांची पत्नी असं म्हणाली की, “या सगळ्या पहिली मदत झाली ती ईश्वराची. विजय कदम यांना झालेल्या आजारपणात आम्हीच जर मानसिकदृष्ट्या खचलो असतो तर तेही खचले असते. त्यामुळे मी व गंधार (मुलगा) त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिलो. विजय हे सर्वांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्याच्याविषयी मी इंडस्ट्रीत कुणाला फारसे काही सांगितले नाही. कारण जर त्याच्या आजारपणाची बातमी कळली असती तर सर्वांचे फोन कॉल्स घेण्यातच माझा दिवस गेला असता. त्यामुळे मी कुणालाच काही सांगितलं नाही.”

आणखी वाचा – मुलगा झाला हो! ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेता झाला बाबा, बाळासह क्यूट फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

विजय कदम यांच्या चार केमिओथेरपी व दोन सर्जरी झाल्यानंतर मी फक्त विजय पाटकर व जयवंत वाडकर यांना विजयविषयी सांगितलं. कायारण हे तिघे त्रिकुट आहेत. त्यामुळे त्यांना विजयच्या आजाराविषयी माहिती असलं पाहिजे म्हणून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला सांगितलं. त्यानंतर मग मला मुख्यमंत्र्यांची मदत हवी होती. त्यामुळे सुशांत शेलार व मंगेश देसाई यांच्या मदतीने माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आणि मग त्यांचीही मला मदत मिळाली.”

आणखी वाचा – बहिणीचा जीव वाचवण्यासाठी लीलाने एजेंशी केलं लग्न, घरात आल्यानंतर सूना कशा वागवणार? मोठा ट्विस्ट

दरम्यान, जेष्ठ अभिनेते विजय कदम हे त्यांच्या विनोदी पात्रांमुळे अधिक लक्षात आहेत. त्यांची अनेक नाटकं रंगभूमीवर गाजली. विशेषतः त्याचं ‘विच्छा माझी पुरी करा’ व ‘टूर टूर’ ही नाटकं प्रचंड गाजली. त्यांनी चित्रपट क्षेत्रावरही स्वत:ची पकड मजबूत ठेवली. ‘चष्मेबहाद्दर’, ‘पोलीसलाईन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’व ‘आम्ही दोघ राजा राणी’ हे चित्रपट खूप नावाजले.

Tags: marathi actormarathi entertainment newsVijay KadamVijay Kadam Marathi News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Maharashtrachi Hasyajatra fame Arun Kadam's daughter opened a new hotel in Thane and shared a video of it on social media.

अरुण कदमांची लेक व जावयाने ठाण्यामध्ये सुरु केलं स्वतःचं मोठं रेस्टॉरंट, इतकं प्रशस्त आणि मोठी आहे जागा, नावही ठेवलं फारच खास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.