‘गोंधळात गोंधळ’, ‘संसार संसार’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून झळकलेली अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख. रंजना देशमुख या सिनेसृष्टीत रंजना या नावानेच ओळखल्या जायच्या. ७० चा ब्लॅक अँड व्हाईट काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री रंजना यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच. (Ashok Saraf Ranjana Deshmukh)

रंजना १९८७ मध्ये ‘झुंजार’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगलोरला जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यांचा डावा हातही निकामी झाला. त्यावेळी रंजना केवळ ३२ वर्षांच्या होत्या. रंजना यांनी या भीषण अपघातानंतर आयुष्याची शेवटची १३ वर्षं ही व्हीलचेअरवर काढली.
पहा अशोक सराफ आणि रंजना यांचे किस्से – (Ashok Saraf Ranjana Deshmukh)
असं म्हणतात की रंजना आणि अशोक सराफ यांच्यात प्रेमाचे नाते होते. त्यांच्या जोडीने अनेक चित्रपट हिट केले. ते एकमेकांशी लग्नही करणार होते. परंतु रंजना यांचा अपघात झाला आणि त्यांची कारकीर्द तिथेच खंडित झाली. आणि त्या दरम्यान अशोक सराफ आणि रंजना यांचे प्रेमही तिथेच थांबले. पुढे रंजना खचत गेल्या आणि २००० साली परेल येथील त्यांच्या घरी वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांचे हृदय विकाराने निधन झाले.(Ashok Saraf Ranjana Deshmukh)

अशोक सराफ यांच्या ‘मी बहुरूपी’ या पुस्तकात ‘माणसं’ या प्रकरणात त्यांनी रंजनाची आठवण काढली आहे. रंजना यांच्यासोबत केलेल्या सिनेमांबद्दल बोलताना यांत त्यांनी एक वाक्य अधोरेखित केलंय. मराठी चित्रपटसृष्टीतल्या अत्यंत मेहनती अभिनेत्रींमध्ये मी रंजनाचं नाव घेईन असे अशोक सराफ म्हणाले आहेत. त्यांनी यांत असेही म्हटलं आहे की, विलक्षण निरीक्षणशक्ती आणि नवीन काही शिकल्यानंतर ते आत्मसात करायची वृत्ती तिच्यापाशी होती. शिवाय माझी फॅन तर ती आधीपासूनच होती. (Ashok Saraf Ranjana Deshmukh)
====
हे देखील वाचा – मल्टीटॅलेंटेड भाऊ! अभिनय, गायन, आणि आता भाऊंच्या वादनाच्या कलेचं कौतुक
====
त्यांनी एक किस्सा शेअर करत सांगितलं की, एकदा एका सेटवर रंजनाने एक विनोदी सीन चांगला केला होता. छान म्हटलंस ग हे वाक्य, मी तिला म्हणालो. तर म्हणाली, ‘यांत माझं कुठे काय आहे? मी इथे खुर्चीवर बसते आणि तू कॅमेऱ्यासमोर काय करतोस ते बघते आणि तेच करते.’
विनोदी सिनेमांसाठी तर अशोक सराफ आणि रंजना या जोडीचं नाव प्रेक्षकांच्या तोंडावर रेंगाळातच असायचं.