महाराष्ट्रात प्रत्येक सणांचे विशेष महत्व आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक सण हा उत्साहा.;ने आणि जोमाने साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे फाल्गुन महिन्यात होळी हा सण साजरा केला जातो. होलिका दहन हे पौर्णिमेच्या रात्री केले जाते. त्याच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन साजरा केला जातो तर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते. होळीचा उत्सवही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तर राज्यातील विविध भागात ही होळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. होळीचा सण हिवाळा संपला असून उन्हाळा सुरु झालाय हे सांगतो. वाईटावर विजय मिळवत साजरी केल्या जाणाऱ्या या होळीला खरी रंगत येते ती गाण्यांनी.(holi special marathi songs)
होळी निमित्त मराठी चित्रपटातील गाण्यांनी खऱ्या अर्थाने रंगत येते. मराठी चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक अशी होळीची, धूलिवंदनची आणि शिमग्याची गाणी आहेत. ही गाणी लागली की आपसूकच सगळेच जण ठेका धरायला लागतात. चला तर मराठी चित्रपटातील प्रसिद्ध पाच गाणी पाहुयात.
चला पाहुयात होळी स्पेशल मराठी गाणी – (holi special marathi songs)
होळी म्हटलं की पहिलं ओठावर येणारं आणि खूप गाजलेलं गाणं म्हणजे ‘लय भारी’ चित्रपटातील ‘लय लय भारी…’ हे गाणं. या गाण्याने ‘लय भारी’ हा चित्रपट अधिक प्रसिद्ध झाला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या गाण्यात अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री राधिका आपटे यांच्यासह गेस्ट अपिअरन्समधील जेनेलियामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडलं. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर गायक स्वप्नील बांदोडकर आणि योगिता गोडबोले यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात हे गाणं स्वरबद्ध केले आहे.(holi special marathi songs)
७०च्या दशकात अशोक सराफ आणि रंजना यांनी ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना रंगीन केला होता. त्यांच्या ‘गोंधळात गोंधळ’ चित्रपटातील ‘अगं नाच नाच नाच राधे उडवू या रंग’ या गाण्यानं तर रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. गायक सुरेश वाडकर यांच्या आवाजातील हे गाणं संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केले आहे.
====
हे देखील वाचा – ‘यांत माझं कुठे काय आहे? मी इथे खुर्चीवर बसते आणि तू काय करतोस ते बघते आणि… “रंजना अशोक मामांना म्हणाल्या होत्या…”
====
‘खेळताना रंग बाई होळीचा होळीचा..’ हे गाणं लागताच होळी खेळायचा उत्साह दुप्पटीने वाढतो. ही एक लावणी असून गायिका उत्तरा केळकर यांनी या लावणीला आवाज देऊन चार चाँद लावले आहेत. तर संगीतकार अशोक वायंगणकर आणि मधू रेडकर यांनी या लावणीच्या संगीताची बाजू पेलवली आहे.
‘दगडी चाळ’ चित्रपटातील ‘मन धागा धागा’ हे गाणं विशेष गाजलं. गाण्याची सुरुवातच धूलिवंदननेच होते. हे गाणं अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. तरुणाईला भुरळ पाडण्यात या गाण्याचं विशेष स्थान आहे.(holi special marathi songs)
‘लई झक्कास’ चित्रपटातील ‘होळी रे होळी पुरणाची पोळी…’ हे गाणं तर सर्वानाच ज्ञात आहे. हे गाणं लागलं की होळी स्पेशल पुरणपोळीची आठवण होतेच. या गाण्याला गायक सचिन पिळगांवकर आणि गायिका साधना सरगम यांनी स्वरसाज चढवलाय. तर संगीतकार संजयराज गौरीनंदन यांनी संगीताची बाजू सांभाळली आहे.