मालिकाविश्वातील सध्या आघाडीची मालिका म्हणजे आई कुठे काय करते. या मालिकेत नेहमी अनेक चढउतार प्रेक्षकांना पाहायला मिळतात. कुटुंब आणि आई यांच्या मध्ये चालणाऱ्या भावनिक नात्याची सांगड घालणारी ही कथा अरुंधती या पत्राभोवती फिरते. पहिलं लग्न, नवऱ्याचा विचित्र स्वभाव पण कुटूंबावर असलेलं तीच प्रेम या मुळे प्रेक्षकांना ही मालिका नेहमी मनोरंजित करत आलेली आहे. मालिकेत अखेर अरुंधतीने स्वतःसाठी एक निर्णय घेऊन आशुतोष सोबत दुसरं लग्न केलं आणि नवीन संसार सुरु केला. पण नवीन संसार सुरु केल्यानंतरही कुटुंबाकडे तीच दुर्लक्ष झालेलं दिसत नाही.(Aai Kuthe Kay Karte)

मालिकेत सध्या अरुंधतीच्या मुलीचा म्हणजेच इशाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रम पार पडला. आणि या कार्यक्रमात अनिरुद्धची नवीन बिझनेस पार्टनर आणि आशुतोषची बहीण वीणाची इंट्री दाखविण्यात आली आहे. वीणा ने घरात येताच आता अनिरुद्धला देखील खडेबोल सुनावल्याचं पाह्यला मिळतंय. आशुतोष आणि वीणा बोलत असताना अनिरुद्ध तिथे येतो आणि मध्ये बोलतो यावरून वीणा ‘ मी तुम्हाला तुमचं काम बघून माझ्या बिझनेस मध्ये घेतलंय पण माझ्या घरगुती गोष्टींमध्ये पडायची तुम्हाला काहीच गरज नाही असं सुनावते.
हे देखील वाचा – ‘खऱ्या आयुष्यात ही सासू म्हणून रत्नमालाचं हवी आहे’-तन्वीने व्यक्त केली इच्छा
पुढे अनिरुद्ध आशुतोषला ‘मला माहिती न्हवत रे तुला एवढी सुंदर, स्मार्ट बहीण आहे ते आता तू जरा माझ्याशी नीट वाग मी तुझ्या बहीणच पार्टनर आहे असं म्हणतो. यावर आशुतोष रागवल्याचं देखील पाहायला मिळत.
तर आधी अरुंधती नंतर संजना आणि आता वीणा ही अनिरुद्धच्या विरोधात जाणार का? कि वीणा आणि अनिरुद्धच्या बिझनेस मध्ये आता काय नवीन वळण येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.(Aai Kuthe Kay Karte)