Ishita Dutta And Vatsal Sheth Shared Goodnews : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री इशिता दत्ता पुन्हा एकदा आई होणार आहे आणि या बातमीने तिचा पती वत्सलचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. बाळ होणार या गुडन्यूजने इशिता आणि वत्सल दोघेही खूप उत्साही आहेत. सन २०२३ मध्ये, इशिता आणि वत्सल सेठ हे त्यांचा मुलगा वायुचे पालक बनले आणि आता आणखी एका गरोदर राहिल्याने त्यांच्या घरात आनंद पसरला आहे. वत्सल सेठ नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वडील होण्याविषयी बोलला. पत्नी इशिताची ही दुसरी गर्भधारणा कशी आहे याबाबतही त्याने भाष्य केलं. अजय देवगणची ऑनस्क्रीन लेक म्हणून इशिताला ओळख मिळाली आहे. तर ‘टार्झन’ चित्रपटात अजयच्या मुलाची भूमिका साकारणारा वत्सल शेठ होता.
‘दृश्यम’ चित्रपटांमध्ये अजय देवगणच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता पुन्हा गरोदर आहे. वत्सल सेठ याने ‘हिंदुस्तान टाईम्स’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, हे माझ्यासाठी सरप्राईज होते आणि या सरप्राईजने मी खूप खूश आहे. जेव्हा इशिताने मला प्रेग्नेंसीबद्दल सांगितलं ‘Ohh Waah’ अशी माझी प्रतिक्रिया होती. मला काहीच कळत नव्हतं. बाबा म्हणून माझ्यासाठी ही खूप मोठी बातमी होती, त्यामुळे मला खूप आनंद झाला. इशिता आमच्या खोलीत आली आणि तिने मला ही बातमी दिली होती. मला आठवतंय इशिताने त्या दिवसांमध्ये सांगितलं, जेव्हा वायू खूप चिडचिड करायचा. आमच्या कुटुंबात नवीन सदस्य जुलैमध्ये येणार आहे. आम्ही लोकांना याबद्दल सांगण्यापूर्वी थोडा वेळ घेतला. आम्ही यावर चर्चा केली, कारण दुसरी गर्भधारणा निश्चितपणे पहिल्यापेक्षा खूप वेगळी असते,” असंही तो म्हणाला.
ई-टाइम्सशी बोलताना इशिता म्हणाली, “यावेळी आम्ही जास्त आनंदी आणि उत्साही आहोत. वायूसोबत प्रत्येक अनुभव नवीन होता. मला आठवतं की मी अनेकदा डॉक्टरांकडे जायचे, पण यावेळी माझ्या डॉक्टरांना मी जास्त वेळा फोन करत नाही याचं मलाच आश्चर्य वाटतंय. माझे आईवडील आमच्याबरोबर राहायला आले आहेत, त्यामुळे माझ्या घरी चांगली सपोर्ट सिस्टीम आहे”.
आणखी वाचा – रिचा चड्डा व अली फजलने ठेवलं लेकीचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
इशिता दत्तने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिच्या दुसर्या गर्भधारणेचे संकेत दिले. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर करत याबाबतची अपडेट दिली. दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०१७ साली लग्नगाठ बांधली. लग्नानंतर सहा वर्षांनी त्यांनी पहिल्या बाळाचं स्वागत केलं आणि आता इशिता लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे.